बाळासाहेब थोरात यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन, औरंगाबादच्या नामांतराला विरोध केल्याने मराठा क्रांती मोर्चा संतप्त

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थोराताच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले. Maratha Kranti Morcha is angry over Balasaheb Thorat


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद: औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थोराताच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले.

औरंगाबादचे संभाजीनगर करावी, अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाव बदल हा आमचा (महाविकास आघाडी) कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असे म्हटले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारत तो फाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली. किमान समान कार्यक्रमात नामांतरासारख्या बाबीचा समावेश नाही. अशा नामांतरामुळे सामान्यांचा विकास होतो असे आम्ही मानत नाही. केवळ नामांतरच नाही तर घटनेतील प्रास्ताविकेमध्ये दिलेल्या मूल्यांची प्रतारणा होईल अशा कोणत्याही कृतीस कॉंग्रेसचा विरोध असेल. शहरांची नावे बदलल्याने सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल होणार आहे? या उलट यामुळे जो सामाजिक विद्वेष निर्माण होईल तो फायदेशीर ठरणार नाही, ते आपले उदिष्ट नाही.

Maratha Kranti Morcha is angry over Balasaheb Thorat

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आणि श्रद्धास्थान आहे. या बाबतीत शंका बाळगण्याचे कारण नाही. मात्र ज्यावेळी आपण महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे त्यावेळी सर्वसामान्य माणूस केंद्रभूत मानत त्याच्यासाठी काय चांगलं करता येईल हे काम आपल्याला करायचे आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*