शेतकरी आंदोलनात माओवांद्याची छुपी नव्हे, तर जाहीर घुसखोरी; आंदोलनाला पाठिंबा देत माओवाद्यांचे प्रजासत्ताक दिनावर बहिष्काराचे आवाहन

२६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार घालण्याचे आवाहनच माओवाद्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पत्रकातून केले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाबी श्रीमंत शेतकऱ्यांचे आंदोलन माओवाद्यांनी हायजॅक केल्याचे वारंवार आरोप होत असताना, आता माओवादी स्वतःहूनच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. माओवादी कम्युनिस्ट पार्टीने अधिकृत पत्रक काढून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाच त्याच बरोबर स्वतःचा अजेंडाही त्यात चालवून घेतल्याचे दिसतेय. maoists communists supports farmers agitation

२६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार घालण्याचे आवाहनच माओवाद्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पत्रकातून केले आहे.माओवाद्यांनी आणि शाहीनबागी इस्लामी ताकदींनी शेतकरी आंदोलन हायजॅक केल्याचे आरोप होतच आहेत. पण आता माओवादी स्वतःच अधिकृत पत्रक काढून पाठिंबा द्यायला पुढे आल्याने तसेच थेट प्रजासत्ताक दिनावर बहिष्काराची भाषा त्यांनी वापरल्याने शेतकरी आंदोलक नेत्यांची पंचाइत झाल्याचे दिसते आहे.

maoists communists supports farmers agitation

माओवादी नुसते आंदोलनाला पाठिंबा देऊन आणि प्रजासत्ताक दिनावर बहिष्काराचे आवाहन करून थांबले नाहीत, तर त्यांनी “भांडवलदारी ब्रिटन”चे पंतप्रधान बोरिस जॉन्सज चले जावची घोषणाही दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील भारत दौऱ्यावर असताना डाव्या पक्षांनी आणि माओवाद्यांनी त्यांच्यावर अशाच बहिष्काराचे आवाहन केले होते. निदर्शने करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी त्यांना यश आले नव्हते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*