मनसुख हिरेन यांच्या खुनात सचिन वाझेच मुख्य आरोपी; एसटीएचे कोर्टात प्रतिपादन; मुख्य सूत्रधार सापडायचेत

प्रतिनिधी

मुंबई – मनसुख हिरेन यांच्या खुनात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच मुख्य आरोपी आहे, याचा पुनरूच्चार राज्याच्या एटीएसने आज कोर्टात केला आहे. परंतु, सचिन वाझे हे एनआयएच्या कोठडीत आहेत. तरी देखील ते फरार असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. Mansukh hiren murder case; ATS claims sachin vaze is main accused, is absconding, he is in NIA custody

दरम्यान मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास आमच्याकडे सोपवावा, असे पत्र केंद्रीय तपास संस्था एनआयएने एसटीएसला पाठविले आहे. उद्या हा तपास सोपविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.तत्पूर्वी, डीएसपी. शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन कट उघडकीस आणल्याचे स्पष्ट केले आहे. सचिन वाझे हा फरार असल्याचे एटीएसने कोर्टात सांगितले आहे. वाझेची एनआयए कोठडी २५ मार्चला संपणार आहे. त्यानंतर एटीएस त्याची कोठडी मागून त्याला आपल्या ताब्यात घेण्याची म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणेकडून राज्याच्या तपास यंत्रणेच्या ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

अर्थात कोर्टामध्ये एएनआय आणि एटीएस या दोन्ही संस्था सचिन वाझेच्या पुढच्या चौकशीसाठी ताबा एकाच वेळी मागणार का या प्रश्नाचे उत्तर २५ तारखेपर्यंत किंवा २५ तारखेला मिळू शकेल.

Mansukh hiren murder case; ATS claims sachin vaze is main accused, is absconding, he is in NIA custody

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*