पूजा चव्हाण ऑडिओ क्लिप आणि मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालात छेडछाड; स्वतंत्र चौकशीची आशिष शेलार यांची मागणी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालात छेडछाड केली जात असल्याची शंका भाजपाने उपस्थित केली आहे. पूजा चव्हाण प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लिप सांताक्रुज येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय? तसेच मनसुख हिरेन यांचे शवविच्छेदन अहवालातही छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने, या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. Mansukh Hiren Deathcase Pooja Chavan Suicide Case Ashish Shelar Uddhav Thackeray Maharashtra Govt

पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “ठाकरे – पवार सरकारची हेराफेरी अजूनही सुरुच आहे. रोज नवीन हेराफेरी ठाकरे – पवार सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय.पूजा चव्हाण या आत्महत्या – हत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रूझ येथील फाँरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत, त्यामध्ये छेडछाड सुरू आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच, असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.“मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसेच शवविच्छेदन करतानाचे रेकॉर्डिंग पोलिसांना पूर्णपणे देण्यात आलेले नाही. त्यामध्ये सुध्दा छेडछाड केली जाते आहे की काय ? अशी शंका आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत पुराव्यांची तपासणी होण्याची गरज आहे,” असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

मर्सिडीज कार आणि नोटा मोजण्याचे मशीन

एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीज केली. यात पैसे, कपडे आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली. त्यावर बोलताना शेलार म्हणाले,”एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत सापडलेल्या नोटा तसेच पैसे मोजण्याचे मशीन, हाच का तो आघाडी सरकारचा “किमान समान कार्यक्रम” आहे का?, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

Mansukh Hiren Deathcase Pooja Chavan Suicide Case Ashish Shelar Uddhav Thackeray Maharashtra Govt

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती