पाठिंब्याच्या किंमत वसूलीला सुरूवात; विधानसभेच्या अध्यक्षपदाबरोबरच काँग्रेसची उपमुख्यमंत्रीपदाची आग्रही मागणी

विशेष प्रतिनिधी

यवतमाळ : महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारमध्ये आत्तापर्यंत किरकोळ कुरबूरी करून शांत राहिलेल्या काँग्रेस नेत्यांनी आपण दिलेल्या पाठिंब्याची वसूली करायला सुरूवात केली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदावर काँग्रेसचा हक्क आहेच, त्याच बरोबर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देखील पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस नेत्यांनी सुरू केली आहे.manikrao thakre demands DyCM post for congress

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे समान सरकार आहे. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच आहे. त्यात दोन्ही पक्ष सहकार्य करीत आहेत. सर्वांना घेऊन चालायचे असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे, अशी मागणीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे हे बरीच वर्षे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या सारख्या नेत्याने उपमुख्यमंत्रीपदाची मागणी करणे याला राजकीय महत्त्व आहे.


पठ्ठे, मास्कशिवाय फिरतायत,डोके फोडून घ्यायचे का?; अजित पवार संतापले


काँग्रेसने नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद सोडायला लावून महाविकास आघाडीला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीला सामोरे जावे लागण्याची राजकीय व्यवस्था करून ठेवली आहे. यात आपली बार्गेनिंग पॉवर दाखविण्याची संधी काँग्रेसला घ्यायची आहे. संख्याबळाच्या आधारावर ठाकरे – पवारांनी काँग्रेसला सरकारमध्ये तिय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. आता त्याची भरपाई करायची वेळ काँग्रेसश्रेष्ठींनी ठाकरे – पवारांवर आणल्याचे मानले जात आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा नुसती सुरू झाली, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे कान उभे राहिले होते. आपल्याच पदाला समांतर स्पर्धक उभा राहायला नको म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ती चर्चाच काल फेटाळून लावली होती. तरी देखील आज माणिकराव ठाकरे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने काँग्रेससाठी उपमुख्यमंत्रीपदाची थेट मागणी करून शिवसेना आणि विशेषतः राष्ट्रवादीला राजकीय दणका दिल्याचे मानण्यात येत आहे.

‘महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले होते, तेव्हाच उपमुख्यमंत्रिपद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्याचे ठरले होतें. मात्र शेवटी उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला आणि विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले होते’, असा खुलासा माणिकराव ठाकरे यांनी केला. किमान समान कार्यक्रमावर सरकार चालू आहे आणि सर्वांना घेऊन चालायचे असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे, असे मत माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

manikrao thakre demands DyCM post for congress

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*