विशेष प्रतिनिधी
कोलकता : सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर त्यांचे वडिल आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे ममतादीदी भडकल्या असून हे तर धोका देणारे ‘मीर जाफर’ आहेत, अशी सडकून टीका त्यांनी केली.Mamta lashes on Adhikari Family says they are Mir Jafers
अधिकारी कुटुंबाचा खरा चेहरा मला ओळखता आला नाही, ही माझी चूकच झाली, मी गाढवच ठरले, असे म्हणत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शिशिर अधिकारी यांच्या भाजपप्रवेशावर संताप व्यक्त केला.
एकेकाळचे निकटचे सहकारी आणि सध्याचे थेट प्रतिस्पर्धी असलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याबद्दल बोलताना ममता म्हणाल्या की, अधिकारी कुटुंबीयांनी पाच हजार कोटी रुपयांची माया जमविल्याचे आरोप होत आहेत. मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यावर याबाबत चौकशी करणार आहे.
१७५७ मध्ये प्लासीच्या लढाईत सिराज उदौला या बंगालच्या अखेरच्या नवाबाचा सेनापती असलेल्या मीर जाफरने नवाबाचा विश्वाबसघात केल्याने इंग्रजांचे फावले होते.
विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी आणि तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये थेट सामना होणार आहे. हा मतदारसंघ पूर्व मिदनापूरमध्येच येतो. अधिकारी कुटुंबाच्या बालेकिल्ल्यातील ही लढत ममता यांनीही प्रतिष्ठेची केली आहे.
ही निवडणूक आपला मुलगा सुवेंदू सहज जिंकेल आणि पूर्व मिदनापूरमध्ये तृणमूलचा प्रचंड पराभव होईल , असा विश्वा स शिशिर यांनी व्यक्त केला आहे. अधिकारी कुटुंबातील राजकीय वजन असलेल्या बहुतेक सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Mamta lashes on Adhikari Family says they are Mir Jafers