पूर्वी माकपने आपल्यावर हल्ले केले आता भाजप तेच करत आहे, ममता बॅनर्जी यांचा घणाघात


वृत्तसंस्था

कोलकता : आपण घरातच राहावे, अशी भाजपची इच्छा होती आणि आपल्याला दुखापत झाली, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. पूर्वी माकपने आपल्यावर हल्ले केले आता भाजप तेच करत आहे, असे त्या म्हणाल्या. Mamata targets BJP in poll rally

व्हिलचेअरवर बसूनच ममता बॅनर्जी यांनी जाहीर सभेत भाषण केले. ममता म्हणाल्या, माझा आवाज कोणीही बंद करू शकत नाही. आम्ही भाजपला नक्कीच पराभूत करू. आपण पुन्हा सत्तेत आलो तर बंगालच्या नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल.मोदी यांनी बिहारच्या लोकांना मोफत लस देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु सत्तेत येऊनही लस दिली नाही. ते जनतेला खोटे बोलले, पंतप्रधानांचे सहकारी हॉटेलमध्ये जेवण करतात आणि आपण दलित कुटुंबांच्या घरी जेवल्याचे सांगतात. हा गरिबांचा अपमान आहे, असा ममतांनी आरोप केला.

अमित शहा देश चालवण्याऐवजी येथे येऊन बसले आहेत. तृणमूल कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी ते कारस्थान रचत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. त्यांना काय हवंय. मला मारुन निवडणूक जिंकू असा जर ते विचार करत असतील ते चुकीचा विचार करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

Mamata targets BJP in poll rally

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था