ममतांनी आपला मेडीकल रिपोर्ट सार्वजनिक करावा, अमित शहा यांनी दिले आव्हान

नंदीग्राम येथे आपल्यावर काही जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पाय फॅक्चर झाल्याचे सांगत जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करत आहेत. मात्र, त्यांच्या या सहानुभीतील हवाच काढून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सज्ज झाले आहेत. ममतांनी आपला मेडीकल रिपोर्ट सार्वजनिक करावा असे आव्हान त्यांनी दिले आहे. Mamata should make her medical report public, challenged Amit Shah


विशेष प्रतिनिधी

मेदिनीपूर : नंदीग्राम येथे आपल्यावर काही जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पाय फॅक्चर झाल्याचे सांगत जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करत आहेत. मात्र, त्यांच्या या सहानुभीतील हवाच काढून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सज्ज झाले आहेत. ममतांनी आपला मेडीकल रिपोर्ट सार्वजनिक करावा असे आव्हान त्यांनी दिले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मेदिनीपूर येथील रोड शो दरम्यान एका वाहिनीशी बोलताना अमित शाह यांनी ही मागणी केली आहे.ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीला भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावर अमित शाह म्हणाले की, ममता बॅनर्जींना इतकंच वाटत असेल, तर त्यांनी आपला मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक केला पाहिजे. ते म्हणाले की, बंगाली जनतेच्या इच्छेनुसारच संकल्पपत्र तयार करण्यात आले आहे. भाजपचे संकल्पपत्र संपूर्ण देशात गांभीर्याने घेतले जाते. सोनार बांगलाची संकल्पना घेऊनच आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत.

सोनार बांगलाचे संकल्पपत्र बंगाली जनतेला घुसखोरी मुक्त राज्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच भ्रष्टाचार मुक्त प्रशासनही देण्याचे वचन आम्ही जनतेला दिले आहे. पश्चिम बंगालमधील जनता परिवर्तनासाठी तयार असून, २०० पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतीले.

पश्चिम बंगालसह संपूर्ण देशभरात असलेल्या शरणार्थींना नागरिकत्व देण्याबाबत आमचे धोरण स्पष्ट आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी पश्चिम बंगालमध्येही केली जाईल. कोट्यवधी शरणार्थींना भाजप सन्मान मिळवून देईल, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

Mamata should make her medical report public, challenged Amit Shah

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*