ममतांचे “होबे ना होबे ना”ला नड्डांचे “भाजप सरकार आबे आबे आबे”ने चोख प्रत्युत्तर


विशेष प्रतिनिधी
वर्धमान : पश्चिम बंगालच्या राजकीय आखाड्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरूद्ध भाजप असा संघर्ष तीव्र होत असतानाच ममतांच्या अत्यंत आक्रमक प्रचाराला भाजपचे नेते तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देताना दिसताहेत. Mamata Banerjee’s “Hobe Na Hobe Na” to Nadda
प्रत्येक प्रचारसभेत ममता बॅनर्जी या “होबे ना होबे ना होबे ना”, म्हणजे हे होणे शक्य नाही… हे होणे शक्य नाही… हे होणे शक्य नाही… असा जोरजोरात धोशा लावत असतात. बंगालमध्ये भाजपचे सरकार कधीच येऊ शकणार नाही, असे आव्हान त्या देत असतात… त्याला आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तसेच खणखणीत प्रत्युत्तर दिले. आधीच ममतांनी नड्डांची नड्डा – कड्डा – फड्डा म्हणून खिल्ली उडविली होती. त्याला वर्धमानच्या प्रचंड रॅलीत नड्डांनी तितक्याच जोशा प्रत्युत्तर दिले. 
नड्डांनी आज चक्क ममतांची नक्कल केली. ते म्हणाले, हे काय ममताजी, प्रत्येक वेळी तुम्ही म्हणता…”ए होबे ना होबे ना…” आम्ही म्हणतो… “मे महिन्यात ए होबे… भारतीय जनता पार्टीचे सरकार आबे आबे आबे”… म्हणजे तुम्ही कितीही नाही म्हणलात तरी मे महिन्यात भाजपचेच सरकार बंगालमध्ये येणारच…

 

Mamata Banerjee’s “Hobe Na Hobe Na” to Nadda

 
नड्डांचा हा विडिओ सध्या बराच व्हायरल होतोय. नड्डांनी ममतांची केलेली नक्कलही लोकांच्या भरपूर पसंतीस उतरते आहे. लोक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ममतांची खिल्ली देखील उडवत आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती