ममतांवर आत्तापर्यंत कधीच हल्ला झाला नाही, मग आताच कोण आलाय हल्ला करायला?; रामदास आठवलेंचा बोचरा सवाल, आरपीआय १५ जागा लढविणार

वृत्तसंस्था

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गेली १० वर्षे सत्तेवर आहेत. त्यांच्यावर आत्तापर्यंत कधीच हल्ला झाला नाही… मग आताच कोण आलाय हल्ला करायला…, असा बोचरा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. Mamata banerjee wasn’t attacked ever before, how can someone do it now: Union Minister Ramdas Athawale

पश्चिम बंगालमधील एकूण स्थिती पाहता तिथे भाजपच सत्तेवर येईल. कारण तिथे ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेवर आहेत आणि लोकांना आता बदल हवा असल्याचे दिसते आहे, असे आठवले यांनी सांगितले.ममता बॅनर्जींवर कोणी हल्ला केला की तो अपघात होता हे मला माहिती नाही. त्या घटनेचा योग्य तपास आणि चौकशी व्हायला पाहिजे. पण यात काही राजकारण असेल असे मला वाटत नाही. त्या १० वर्षे सत्तेवर आहेत. आत्तापर्यंत त्यांच्यावर कधीच कोणी हल्ला केलेला दिसला नाही. मग आताच कोण आलाय, त्यांच्यावर हल्ला करायला…, असा बोचरा सवाल आठवले यांनी केला.

बंगालमध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया १५ ते २० जागा लढवेल आणि भाजपला पाठिंबा देईल, असे आठवले यांनी जाहीर केले.

Mamata banerjee wasn’t attacked ever before, how can someone do it now: Union Minister Ramdas Athawale

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*