जय श्रीराम शब्दाची ममता बॅनर्जी यांना असलेली अॅलर्जी पुन्हा एकदा उघड झाली. पश्चिम बंगाल विधानसभेत जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने ममता बॅनर्जी पुन्हा एकदा भडकल्या.Mamata Banerjee was once again outraged by Jay Shriram announcements
वृत्तसंस्था
कोलकत्ता : जय श्रीराम शब्दाची ममता बॅनर्जी यांना असलेली अॅलर्जी पुन्हा एकदा उघड झाली. पश्चिम बंगाल विधानसभेत जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने ममता बॅनर्जी पुन्हा एकदा भडकल्या.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी विधानसभेत अर्थसंकल्पावर भाषण देत होत्या. तेव्हा भाजपा आमदारांकडून विधानसभेत जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. यावर ममता बॅनर्जी चांगल्याच भडकल्या.
विरोधी आमदारांच्या या कृतीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्या व त्यांनी म्हटले की, मी आजपर्यंत कधीच बजेट दरम्यान अशाप्रकारची घोषणाबाजी पाहिली नाही. भाजपाला बजेटवर चर्चा नकोच आहे.
राज्य सरकारद्वारे राज्यपालांना सत्राच्या पहिल्या दिवशी न बोलावण्यात आल्याने भाजपाचे आमदार नाराज होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व डाव्या पक्षांच्या आमदारांनी देखील बजेट सत्रावर बहिष्कार टाकला.
यापूर्वी २३ जानेवारी रोजी व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत देखील, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणाबाजीमुळे चांगल्याच भडकल्या होत्या. तेव्हा त्यांनी भाषण करण्यास नकार देत, जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली होती.