ममता बॅनर्जी पाच वर्षांत झाल्या गरीब, संपत्ती निम्याने कमी

राजकारणामध्ये राहणाऱ्यांची संपत्ती दिवसोंदिवस वाढते. एवढेच नव्हे तर अगदी सामान्य माणसाचीही संपत्ती वाढत असते. याचे मुख्य कारण म्हणजे पैशाची किंमत कमी होते. परंतु, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची संपत्ती पाच वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा निम्मी झाली आहे. त्यांच्याकडे केवळ १६.७२ लाख रुपयांची मालमत्ता असून पाच वर्षांपूर्वी तिच ३० लाखांवर होती. Mamata Banerjee poor in five years, wealth halved


वृत्तसंस्था

कोलकत्ता : राजकारणामध्ये राहणाऱ्यांची संपत्ती दिवसोंदिवस वाढते. एवडेच नव्हे तर अगदी सामान्य माणसाचीही संपत्ती वाढत असते. याचे मुख्य कारण म्हणजे पैशाची किंमत कमी होते. परंतु, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची संपत्ती पाच वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा निम्मी झाली आहे. त्यांच्याकडे केवळ १६.७२ लाख रुपयांची मालमत्ता असून पाच वर्षांपूर्वी तिच ३० लाखांवर होती.ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून लढत आहेत. त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरताना संपत्तीचे विवरण देणारे प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यानुसार त्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. त्याचबरोबर स्थावर मालमत्ताही नाही. त्यांच्याकडे एकूण मालमत्ता ही १६.७२ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडे केवळ ६९ हजार २५५ रुपये रोकड आहे. बॅंकेमध्ये १३.५३ लाख रुपये आहेत. १.५१ लाख रुपये निवडणूक खर्चासाठी ठेवलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय बचत पत्रांमध्ये त्यांनी १८ हजार ४९० रुपये गुंतविले आहेत.

त्यांनी गेल्या वर्षी १.८५ लाख रुपयांचा कर भरला आहे. त्यांच्याकडे सोन्याचे ९ ग्रॅम दागिने असून त्याची किंमत ४३ हजार ८३७ रुपये दाखविली आहे. आपल्या काही पुस्तकांची रॉयल्टी मिळाली असल्याचे त्यांनी दाखविले आहे. मात्र, ती केवळ ९३० रुपये आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यांचे वय ६६ असून त्यांनी कोलकाता विद्यापीठातून एमए आणि त्यानंतर एलएलबीची पदवी घेतली आहे.

मागील निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 30 लाख 45 हजार 13 रुपयांची संपत्ती होती. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सुमारे 18 हजार रुपये रोख, बँक खात्यात सुमारे 27 लाख रुपये आहेत. त्याचबरोबर त्यांनी पोस्ट ऑफिस योजनेत सुमारे 18 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांच्याकडे सुमारे 26 हजार रुपयांचे सोने होते. ममता बॅनर्जी यांच्या नावावर जमीन, घर, कार नाही. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातही जागेबद्दल माहिती दिलेली आहे.

Mamata Banerjee poor in five years, wealth halved

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*