ममता बॅनर्जींचा तृणमूल कार्यकर्त्यांवर भरवसा नाय, प्रशांत किशोरांची सुटाबुटातील टीम प्रत्येक मतदारसंघात कामाला


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉँग्रेसच्याच कार्यकर्त्यांवर भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या आयपॅकची सुटाबुटातील टीम प्रत्येक मतदारसंघात कामाला लागली आहे. प्रशांत किशोर यांच्यावर नाराज होऊनच तृणमूलमधील अनेक नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकला होता.Mamata Banerjee not trusting on Trinamool activists, Prashant Kishor’s team works in every constituency


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉँग्रेसच्याच कार्यकर्त्यांवर भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या आयपॅकची सुटाबुटातील टीम प्रत्येक मतदारसंघात कामाला लागली आहे. प्रशांत किशोर यांच्यावर नाराज होऊनच तृणमूलमधील अनेक नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकला होता.

प्रशांत किशोर यांच्या टीममध्ये ऑक्सफर्ड , कॅम्ब्रिजपासून आयआयटी, आयआयएममध्ये शिकलेल्या 25 ते 35 वर्षांच्या तरुणांचा समावेश आहे. आयपॅकने पश्चिम बंगालमध्ये जून-2019 पासून काम करणे सुरू केले होते.या टीमच्या सल्ल्यावरच अनेक नवीन प्रचार मोहीमा सुरू केल्या. उमेदवार निवडीमध्येही आयपॅकच्या सूचनांना महत्व देण्यात आले. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अनेक उमेदवारांची तिकिटे कापली गेल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

पश्मि बंगालमध्ये एकूण 294 विधानसभा जागा आहेत. या सर्वांमध्ये आयपॅकचे मेंबर्स आहेत. कुठे तीन तर कुठे चार सदस्य आहेत. हे लोक स्थानिक उमेदवाराला वरचढ ठरून काम करत आहेत.

आयुष्य राजकारणात घालविलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या हाताखाली काम करावे लागत आहे. हेच तरुण त्यांना जनतेचा फिडबॅक सांगतात. प्रचार मोहीमा आखतात. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय करावे हे सांगतात.

मोदींसाठी काम केलेले प्रशांत किशोर प्रसिद्ध राजकीय रणनितीकार आहेत. सध्या ममता बॅनर्जींसाठी बंगालमध्ये त्यांची टीम काम करत आहे. दीदी के बोलो म्हणजे आपल्या बहिणीला बोला, दीदीर दूत नावाच्या मोबाईल अप्लीकेशनद्वारे ते लोकांपर्यंत पोहोचवित आहेत.

मात्र, संपूर्ण फोकस हा ममता बॅनर्जी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. इतर नेत्यांना बाजुला ठेवण्यात आले असल्याने अनेक नेते नाराज आहेत.

Mamata Banerjee not trusting on Trinamool activists, Prashant Kishor’s team works in every constituency

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती