ममता बॅनर्जी बंगालच्या संस्कृतीसाठी धोकादायक, जे. पी. नड्डा यांचा आरोप

ममता बॅनर्जी सरकारने बंगालची संस्कृती संपुष्टात आणली आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार बंगालच्या संस्कृतीसाठी धोकादायक आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे.Mamata Banerjee is a threat to the culture of Bengal jP Nadda allegation


वृत्तसंस्था

कोलकाता : ममता बॅनर्जी सरकारने बंगालची संस्कृती संपुष्टात आणली आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार बंगालच्या संस्कृतीसाठी धोकादायक आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा यांनी दुसऱ्या परिवर्तन यात्रेला संबोधित करताना ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली.ते म्हणाले की, राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालचा विकास नकोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालला येतात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बंगालचा विकास होईल. आम्ही मोकळ्या हाताने येत नाही तर प्रकल्प घेऊन येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमारे ४ हजार ७०० कोटींचे प्रकल्प बंगालला दिले.

नड्डा म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांच्यावर टीका करायला हवी होती. मात्र, त्यांच्या वडिलांवर केलेली टीका, अभिषेक बॅनर्जी यांची भाषा ही बंगालच्या संस्कृतीला धरून नव्हती. ममता बॅनर्जी सरकार बंगालच्या संस्कृतीसाठी धोकादायक असून, ही संस्कृती हळूहळू संपुष्टात आणण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात पश्चिम बंगाल आणि येथील जनतेबाबत विशेष आदर आहे. तृणमूल काँग्रेसच्या चुकीच्या वागणुकीमुळे आज अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षाला सोडून गेले. ममता बॅनर्जी सरकार केंद्राच्या योजनांची केवळ नावे बदलण्याच्या मागे आहे. बंगालच्या जनतेच्या मनात आता पंतप्रधान मोदींनी स्थान मिळवले आहे, असे नड्डा म्हणाले.

Mamata Banerjee is a threat to the culture of Bengal jP Nadda allegation

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*