Mamata Banerjee Feared Of Jai Shriram slogan, BJP leader arrested for wearing And Distributing Ram name masks In Hugli

ममतांच्या बंगालमध्ये ‘जय श्रीराम’ घोषणेवर बंदी आहे का?, रामनामाचे मास्क वाटल्याने भाजप नेत्याला अटक

विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचा किल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपने हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा मुद्द्यामुळे ममता बॅनर्जी पूर्णपणे हादरल्या आहेत. एवढ्या की, त्यांना जय श्रीराम घोषणेचाही तिटकारा वाटायला लागला आहे. प्रभु श्रीरामांची घोषणा ममता दीदींना एवढी का खटकते, याचे कारण समजायला मार्ग नाही. आता हुगळीमध्ये भाजपने जय श्रीराम नावाचे मास्क वाटप केल्याने ममता दीदींच्या पोलिसांनी भाजप नेत्याला अटक केली आहे. Mamata Banerjee Feared Of Jai Shriram slogan, BJP leader arrested for wearing And Distributing Ram name masks In Hugli


विशेष प्रतिनिधी

हुगळी : विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचा किल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपने हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा मुद्द्यामुळे ममता बॅनर्जी पूर्णपणे हादरल्या आहेत. एवढ्या की, त्यांना जय श्रीराम घोषणेचाही तिटकारा वाटायला लागला आहे. प्रभु श्रीरामांची घोषणा ममता दीदींना एवढी का खटकते, याचे कारण समजायला मार्ग नाही. आता हुगळीमध्ये भाजपने जय श्रीराम नावाचे मास्क वाटप केल्याने ममता दीदींच्या पोलिसांनी भाजप नेत्याला अटक केली आहे.

पश्चिम बंगालच्या हुगळीमधील श्रमपूर येथे भाजप नेते अमनीश अय्यर हे लोकांना ‘जय श्रीराम’ नावाचे मास्क वाटत होते. दरम्यान, पोलिसांनी तेथे पोहोचून भाजप नेत्याला अटक केली. यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी निषेध करत ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. भाजप नेत्याला अटक केल्यानंतर पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. मास्क वाटप करणाऱ्या पक्षाच्या नेत्याला अटक करणे म्हणजे पूर्णपणे हुकूमशाही असल्याची टीका भाजपने केली आहे.बंगाल भाजपने ट्विट केले की, ‘पूर्णपणे हुकूमशाही! भाजप कार्यकर्त्याला सेरामपुर, हुगळी पोलिसांनी अटक केली. त्यांचा ‘गंभीर गुन्हा’ असा होता की त्यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेले मास्क घालण्याचे आणि वाटण्याचे धाडस केले. हा पिशी बंगाल आहे, जिथे लोकशाहीमध्ये एक हजार लोक मारले गेले आहेत.

Mamata Banerjee Feared Of Jai Shriram slogan, BJP leader arrested for wearing And Distributing Ram name masks In Hugli

Mamata Banerjee Feared Of Jai Shriram slogan, BJP leader arrested for wearing And Distributing Ram name masks In Hugli

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*