मन की बात हा पंतप्रधानांचा कार्यक्रम आचारसंहितेचा भंग नाही का?, ममतादीदींचा निवडणूक आयोगाला सवाल

विशेष प्रतिनिधी

कोलकता : निवडणूक आयोगात केंद्रीय गृह  मंत्री अमित शहा ढवळाढवळ करीत असल्याच्या आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यावरून आयोगाने त्यांना ठणकावले होते.Mamata Banarjee targest PM Narendra Modi

त्यानंतर ममतादीदींनी आता प्रतिहल्ला केला आहे. मन की बात हा पंतप्रधानांचा कार्यक्रम निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.लसीवरून प्रसिद्धी लाटू नका असे आयोग मोदी यांना का सांगत नाही ? मन की बातमधून प्रत्येक गोष्ट सुरु आहे. आयोग त्यांच्यावर कारवाई का करीत नाही ? असा सवालही त्यांनी केला.
त्या म्हणाल्या, निवडणूका असल्या की भाजप नेते रोख रक्कम घेऊन येतात आणि ती वाटतात,

पण अम्फन चक्रीवादळ आले तेव्हा ते कधीही दिसले नाहीत. मानव संकटात सापडतो तेव्हा भाजप नेहमीच गैरहजर असतो. निवडणूकीच्यावेळी मात्र ते बाहेरून हेलिकॉप्टर, विमानातून येतात, पैसे वाटून मते लुटतात, भाजप हा दंगलखोरांचा पक्ष असल्याचा आरोप करून त्या म्हणाल्या की, आम्हाला हिंसाचार, रक्तपात नको आहे. आम्ही बंगालमध्ये सुडाच्या राजकारण होऊ देणार नाही.’

Mamata Banarjee targest PM Narendra Modi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*