तांडवच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, तुम्ही लोकांच्या भावना दुखवू शकत नाही


हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी ‘तांडव’ या वेब सीरिजचे निर्माता आणि अभिनेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. तुम्ही लोकांच्या धार्मिक भावना दुखावू शकत नाहीत, असे न्यायालयाने सुनावले आहे. makers of Tandav were slammed by the Supreme Court


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी ‘तांडव’ या वेब सीरिजचे निर्माता आणि अभिनेत्यांना सर्वोच्च न्यायालयानेही फटकारले आहे. तुम्ही लोकांच्या धार्मिक भावना दुखावू शकत नाहीत, असे न्यायालयाने सुनावले आहे.

‘तांडव’चे निर्माते आणि कलाकारांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. न्यायालयाने मेकर्स आणि कलाकारांना अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आहे. तुम्ही लोकांच्या धार्मिक भावना दुखावू शकत नाहीत, असे यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सहा वेगवेगळ्या राज्यात दाखल झालेल्या एफआयआर वर्ग करणे आणि त्या एकत्र करण्याच्या अपीलवर न्यायालयाने नोटिस जारी केली आहे.तांडव ही वेब सीरिज प्रदर्शनापासूनच वादात सापडली आहे. या वेब सीरिजमधील काही संवाद धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे आक्षेप आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये या वेब सीरिजचे निर्माते आणि कलाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तांडवचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, अँमेझॉन प्राईम इंडियाच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, निर्माता हिमांशू मेहरा आणि तांडवचे लेखक गौरव सोलंकी, अभिनेता मोहम्मद झिशान अयुब या सर्वांकडून सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या तिन्ही याचिकांवर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम.आर. शहा यांच्या खंडपाठासमोर सुनावणी झाली.

त्यावेळी न्यायालयाने या सर्वांना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. अटकपूर्व जामीन किंवा गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. आम्ही घटनेने दिलेल्या अधिकाराविरुद्ध जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही अंतरिम संरक्षण बहाल करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले.

makers of Tandav were slammed by the Supreme Court

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था