तो महेबूब शेख राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेक्षाध्यक्षच

अत्याचार करणारा महेबूब शेख दुसरा तिसरा कोणी नसून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्षच आहे. यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले असून पोलीस मेहबूब शेख यांना जबाबासाठी बोलवणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. Mahboob Sheikh is the state president of Nationalist Youth Congress


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद: मेहबूब शेख वर बलात्काराचा ३७६ गुन्हा दाखल करणार्या पिडीतेने एक व्हिडिओ शेअर करत आरोपी महेबूब शेख हा तो मी नव्हेच असे खोटे बोलत असल्याचे स्पष्ट केले आहे.अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने पिडीता अशाप्रकारे समोर आली आहे.

आपल्यावर अत्याचार करणारा महेबूब शेख दुसरा तिसरा कोणी नसून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्षच आहे. यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले असून पोलीस मेहबूब शेख यांना जबाबासाठी बोलवणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख
यांच्याविरूध्द सिडको पोलीस ठाण्यात शिक्षिकेच्या तक्रारी वरुन बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा २६ डिसेंबर रोजी दाखल झाला होता . या गुंह्याचा तपास पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ करीत आहेत.  गुंह्याचे स्वरूप आणि आरोपी राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. भाजपा महिला मोर्चाने गत सप्ताहात याप्रकरणातील आरोपी महेबूब शेख याला अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. शिवाय प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेत पोलीस आरोपीला वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आरोपी महेबूब शेख यांनी मुंबई पक्ष कार्यालयांत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करतांना त्यांच्याविरूध्द खोटी तक्रार नोंदविण्यात आली. आपल्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या महिलेला ओळखत नाही, कधी भेटलो नसल्याचा दावा शेख यांनी केला होता.

व्हिडीओ झाला व्हायरल या पार्श्वभूमीवर पिडीतेने आज एक व्हिडिओ जारी केला. यात तिच्यावर बलात्कार करणारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हाच असल्याचे स्पष्ट केले. शिवाय मेहबूब शेख खोटे बोलत असल्याचा दावा तिने केला आहे. मी उच्च शिक्षित आहे. यापुढे आपल्याला जे काय बोलायचे ते न्यायालयासमोर बोलेन . पोलिसांना काही सांगणार नाही असेही तिने व्हिडिओ मधून स्पष्ट केले आहे.

Mahboob Sheikh is the state president of Nationalist Youth Congress

बलात्काराचा आरोप असलेले राष्ट्रवादी चे महेबूब शेख यांचा जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात येणार आहे. या करीता लवकरच पोलिसांकडून महेबूब शेख यास हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली जाऊ शकते. मात्र कधी बोलावणार याविषयी मात्र अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*