महाविकास आघाडीतील मदत व पुनर्वसन मंत्र्यांचाच पासपोर्ट जप्त

न्यायप्रविष्ट खटल्यांची माहिती लपवून ठेवल्याच्या आरोपामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. त्यांना ११ मे २०१२ रोजी पासपोर्ट देण्यात आला होता.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : न्यायप्रविष्ट खटल्यांची माहिती लपवून ठेवल्याच्या आरोपामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. त्यांना ११ मे २०१२ रोजी पासपोर्ट देण्यात आला होता. Mahavikas Aghadi’s aid and rehabilitation minister’s passport confiscated

महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या कॉंग्रेस मंत्री आधीच कायद्याच्या कचाट्यात सापडल्या असताना आता वडेट्टीवारांवरही कारवाई होणार आहे. अवैध मार्गाने पासपोर्ट मिळवल्यामुळे वडेट्टीवार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा आणि पासपोर्ट जप्त करावा, याकरिता माजी आमदार मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे.पासपोर्ट विभागाने नोटीस बजावल्यानंतर वडेट्टीवार यांनी २१ डिसेंबर २०२० रोजी स्वत: पासपोर्ट कार्यालयात हजर होऊन त्यांचा पासपोर्ट जमा केला होता. त्यासोबत प्रलंबित फौजदारी खटल्यांमधील आदेशांच्या प्रतीही सादर केल्या. पासपोर्ट विभागाने सत्यता पडताळण्यासाठी कागदपत्रे नागपूर व गडचिरोली पोलिसांकडे पाठविली आहेत.

Mahavikas Aghadi’s aid and rehabilitation minister’s passport confiscated

वडेट्टीवार आणि याचिककार्ते भांगडिया यांचा भागिदारीत कंत्राटदारीचा व्यवसाय होता. नंतर त्यांच्यात वितुष्ट आले आहे. वडेट्टीवार यांनी पासपोर्टकरिता अर्ज करताना त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटले प्रलंबित नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र दिले. गडचिरोली येथे राहणे असताना १० वषार्पासून मुंबईत राहत असल्याचे सांगितले. तसेच, विदेशात जाण्याकरता शिक्षणाचे कारण दिले. अशाप्रकारे त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने पासपोर्ट मिळविला असा भांगडिया यांचा आरोप आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*