- मुख्यमंत्री कार्यालय करणार ‘ लेटर बॉंब ‘ची शहानिशा
विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवेल्या लेटर बॉंबमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली . मात्र या प्रकरणात महाविकास आघाडी पळवाट शोधत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अनिल देशमुख यांनी आरोपाचे खंडण करत परिपत्रक काढले, आता या पत्राच्या सत्यतेची खातरजमा मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे.
परमबीर सिंगची सही त्या पत्रावर आहे.पत्रकार मेघा प्रसाद यांनी आपल्या ट्विटर वर शेअर देखील केले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या बार आणि रेस्टॉरंट्समधून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर मोठा गदारोळ सुरू झालेला असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला मिळालेल्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
‘गृहरक्षक दलाचे कमांडंट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल अॅड्रेसवरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेल्या आणि स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल अॅड्रेस तपासून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे’, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
For all the doubters, the signed copy of #ParambirSingh letter is here. #ParambirSinghLetter pic.twitter.com/visB1jMJl0
— Megha Prasad (@MeghaSPrasad) March 20, 2021
परमबीर सिंह यांच्यांशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलणं टाळलं. मात्र, मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र आपणच लिहलं असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. पत्रात आपण सर्व नमूद केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.