कोरोनाची भीती दाखवून महाविकास आघाडीने भरले कंत्राटदारांचे खिसे, आमदार नमिता मुंदडा यांचा आरोप

कोरोनाची भीती दाखवून महाविकास आघाडी सरकारने केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोरच केला. अंबाजोगाई आणि केजच्या कोविड हॉस्पिटलसाठी खरेदी करण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असल्याची तक्रार केली आहे.Mahavikas Aghadi fills contractors pockets due to fear of corona MLA Namita Mundada alleges


प्रतिनिधी

बीड : कोरोनाची भीती दाखवून महाविकास आघाडी सरकारने केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोरच केला.

अंबाजोगाई आणि केजच्या कोविड हॉस्पिटलसाठी खरेदी करण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असल्याची तक्रार केली आहे.बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यासमोरच मुंदड यांनी हा आरोप केला. मागच्या अकरा महिन्यांमध्ये कोरोनाच्या संकट काळात जिल्ह्यामध्ये 50 कोटी रुपयांचा निधी हा केवळ कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी करण्यात आला.

विशेष म्हणजे यासाठी जिल्हा नियोजन समितीसह गौण खनिज, आपत्ती निवारण अशा विभागांकडूनही निधी उपलब्ध करुन देण्यात आला. मात्र, त्याला पाय फुटले.

केजच्या जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाई शेजारील लोखंडीला उभारलेल्या कोविड रुग्णालयातही सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

इतर रुग्णालयांतही सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र यासाठी दाखविलेला खर्चच मुळात अवास्तव असल्याचा त्यांचा आरोप नमिता मुंदडा यांनी केला आहे.विशेष म्हणजे सीसीटीव्हीचे टेंडर हे या पूर्वीच्या सीएस अर्थात जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढले होते. यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत मुंदडा म्हणाल्या की, टेंडर काढण्याचे काम हे सीएसचे नाही ते एनआयसीने काढणे आवश्यक होते. पण संबंधित कंत्राटदाराला पैसे देण्याच्या उद्देशानेच हे टेंडर काढले.

विशेष म्हणजे लाखो रुपयाचे सीसीटीव्ही बसवल्यानंतरही हे सीसीटीव्ही काम करत नसल्याची माहिती केज उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनीच शल्यचिकीत्सकांना दिली आहे.

Mahavikas Aghadi fills contractors pockets due to fear of corona MLA Namita Mundada alleges

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*