महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचारांचा दावा पोकळ; प्रत्यक्षात नाशिककरांची रूग्णालयांकडून लूट


  • सरकारी रूग्णालयांमध्ये जागाच शिल्लक नाहीत

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोरोनाग्रस्तांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार झाल्याचा ठाकरे – पवार सरकारचा दावा नाशिकमध्ये उघडा पडतोय. दिवसा ढवळ्या रूग्णांची लूट सुरू आहे आणि पालकमंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषदा घेऊन नाशिककरांना लॉकडाऊनच्या धमक्या देण्यात मग्न आहेत.

बऱ्याच दिवसांपासून झोपी गेलेली मनसे देखील आता जागी झाली असून अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे मनसेने भुजबळांवर निशाणा साधला आहे.

मला कोणी विचारेना आणि माझे काही चालेना फेम नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे जिल्ह्याकडे असलेले दुर्लक्ष हे काही नवीन नाही. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारी रूग्णालयांसह इतरत्र होणाऱ्या नागरिकांच्या लुटीबाबत आता मनसेला जाग आली असून ही लूट अपयशी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या दुर्लक्षामुळेच सुरू असल्याचा आरोप करून त्यांना मनसे स्टाईल धडा शिकविण्याचा दम मनसे नेत्यांनी भरला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नाशिककर यांचे एकेकाळी जिव्हाळ्याचे नाते होते, किंबहुना नाशिककरांनी मनसेला सत्ता देत अनुभव घेतला,पण राज ठाकरेंच्या भव्य दिव्य संकल्पना असल्या तरी त्यांचे नंतर काय झाले हे नाशिककरांनी पाहिले आहे. नाशिककरांची लूट करणाऱ्या भुजबळांच्या बाबतीतही हाच अनुभव आला आहे.

आता जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सरकारी रूग्णालयामध्ये जागा शिल्लक नाही, त्यामुळे नागरिक खासगी रूग्णालयाकडे वळले आहे. पण तेथेही कधी नव्हे एवढी प्रचंड लूट सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर सक्त लॉकडाऊनची मागणीही मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला. भुजबळांचा खासगी रूग्णालयावर अंकुश नाही. ते वचक निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच रूग्णालयांची दुकानदारी सुरू असल्याचे पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून खासगी रूग्णालयांमध्ये मोफत उपचार झाले असल्याचा दावा ठाकरे – पवार सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात रूग्णांची प्रचंड लूट होत आहे. पालिका आयुक्तांनी लुट थांबविण्यासाठी लेखा परिक्षकांची नियुक्ती करण्याची केलेली घोषणा आणि भुजबळांनी त्याला खतपाणी घातल्याने हे कितपत यशस्वी झाले. याबद्दल मनसेने संशय व्यक्त केला.

या सगळ्या प्रकारात नाशिककरांची लूट थांबण्याऐवजी सारेच कोरोना गंगेत हात धूवून घेत असल्याचे चित्र आहे. भुजबळ असो कि मनसे असो यांची कृती म्हणजे उंदरास मांजर साक्ष असे नाशिककरांच्याही लक्षात येऊ लागले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था