महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम ; महाराष्ट्राला खुणावतंय ऑलिंपिकचे पदक

  • बीडच्या अविनाश साबळे याने सुवर्णपदक जिंकले
  • अविनाशने नवा राष्ट्रीय विक्रम केला
  • अविनाशने स्टीपलचेसमध्ये स्वत:चा विक्रम मोडला
  • महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याने राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत स्वत:चा विक्रम मागे टाकला आणि पदकाची कमाई केली.

विशेष प्रतिनिधी

पतियाळा : पतियाळा येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली, तर कोमल जगदाळेने रौप्यपदक पटकावले. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रमही नोंदवला. २६ वर्षीय अविनाशने ८ मिनिटे २०.२० सेकंद अशी वेळ नोंदवताना २०१९ मधील स्वत:चाच ८ मि. २१.३७ से. वेळेचा विक्रम मोडीत काढला. राजस्थानच्या शंकर लाल स्वामीने रौप्य व हरयाणाच्या राजकुमारने कांस्यपदक मिळवले. Maharashtra’s Avinash Sable’s national record; Maharashtra marks Olympic medal

नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रीडा संस्थेत सुरू असलेल्या या स्पर्धेत भालाफेक प्रकारात नीरज चोप्रा याने स्वतःचा विक्रम मोडला, तर गोळाफेक प्रकारात तजिंदरपाल सिंग याने ऑलिंपिक पात्रतेसाठी जोरदार प्रयत्न केले.नीरजने या स्पर्धेत 87.80 मीटर भालाफेक करताना नवा स्पर्धा विक्रम केला. अर्थात, 88.07 मीटरचा राष्ट्रीय विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्यापूर्वी, तजिंदरपाल सिंग याने पाचव्या प्रयत्नांत 20.58 मीटर गोळा फेक केली. मात्र, तो देखील ऑलिम्पिक पात्रतेपासून दूरच राहिला.

त्याला अजूनही ऑलिंपिक पात्रतेची संधी आहे

महिलांच्या 3,000 स्टिपलचेस शर्यतीत उत्तर प्रदेशाच्या पारुल चौधरी हिने अखेरच्या 200 मीटरमध्ये महाराष्ट्राच्या कोमल जगदाळेला पराभूत केले. पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत हिमाचल प्रदेशाच्या अंकेश चौधरी याने उपांत्य फेरीत 1 मिनिट 50.81 सेकंद अशी वेगवान वेळ दिली. उपांत्य फेरीत ही तिसऱ्या क्रमांकाची विक्रमी वेळ ठरली. पण, अंतिम फेरीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या मनजित सिंगचे आव्हान असेल.

Maharashtra’s Avinash Sable’s national record; Maharashtra marks Olympic medal

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*