महाराष्ट्रातील नरकासुराने आठ महिने मंदिरे बंद ठेवली, वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांची उध्दव ठाकरेंवर टीका


महाराष्ट्रातील नरकासुराने मंदिरे आठ महिने बंदीवासात ठेवली असताना कोणती दिवाळी साजरी करायची, देवीची मंदिरे बंद असताना कोणत्या लक्ष्मीचे पूजन करणार, वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रावर असूरांचे राज्य असल्याची टीका त्यांनी केली.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील नरकासुराने मंदिरे आठ महिने बंदीवासात ठेवली असताना कोणती दिवाळी साजरी करायची, देवीची मंदिरे बंद असताना कोणत्या लक्ष्मीचे पूजन करणार, असा प्रश्न वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या VISकराडकर यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रावर असूरांचे राज्य असल्याची टीका त्यांनी केली.

महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवून इतर कारभार टप्प्याटप्प्याने सुरू केला आहे. सरकारच्या या निर्णयावर वारकरी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. वारकरी संप्रदायाच्या बंडातात्या कराडकर यांनी या संदर्भात एक पत्रक काढले आहे.

कोणत्याही सरकारी पदाचा अथवा व्यक्तीचा थेट नामोल्लेख टाळून पत्रकातून वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर मंदिरे खुली करण्याचे आश्वासन दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावरच बंडातात्या कराडकर यांनी जोरदार टीका केली. देशभर मंदिरे सुरू झाली तरी महाराष्ट्रातील देव बंदीवासात असताना दिवाळी कशी साजरी करायची अस सवाल त्यांनी केला आहे. कराडकर यांनी म्हटले आहे की, असुरांच्या राज्यात दारूची दुकाने, भाजीमंडई, हॉटेल्स, ढाबे, विवाह, पार्ट्या, मीटिंग सर्रास सुरू आहे. मात्र मंदिरे, वाऱ्या, भजन, सप्ताह यांना पूर्ण बंदी आहे.

कैवारी नास्तिक व अधर्मी असुरांच्या ताब्यात आहे. तो मंदिरे सुरू करू शकत नाही. याच कारणामुळे दिवाळी साजरी न करता शिमगा करा. आंघोळ करायची असेल तर यांच्या नावाने व गोड खायचेच असेल तर यांच्या चौदाव्याच्या नावाने खा.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था