गृह खात्याचे वाभाडे काढत भाजपच्या टार्गेटवर अनिल देशमुख; हिंगणघाट ते पूजा चव्हाण प्रकरणे काढून मागितला राजीनामा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : संजय राठोड यांचा राजीनामा आणि सचिन वाझे यांनी निलंबित करण्यात आल्यानंतर अनिल देशमुख भाजपाने रडारवर आणलेत. हिंगणघाटातील तरुणीच्या मृत्यू ते पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणांसह विविध घटनांचा बाहेर काढत भाजपाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. Maharashtra Politics Bjp Demands Anil Deshmukh Resign Pooja Chavan Palghar Sadhu Mob Lynching


सचिन वाझे प्रकरण राज्यात गाजत असतानाही गृहमंत्रीही बदलणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, खाते बदल करण्याच्या सर्व चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावल्या. तरी देखील भाजपाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाने राज्यात घडलेल्या काही गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत अनिल देशमुख यांना बोचरे सवाल करून राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*