Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Analysis : ग्रामीण महाराष्ट्राचा राजकीय ट्रेंड बदलला; हिंदुत्ववादी पक्षांच्या वळचणीला आले काँग्रेसी पक्ष


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ग्रामीण भागातील राजकीय ट्रेंड पक्षांपेक्षा जास्त मतदारांनीच बदललाय, असे आजच्या निकालांचे विश्लेषण करता येईल. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या रूपाने शिवसेना – राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र आले असले तरी, मतदारांनी मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यापेक्षा शिवसेनेच्या भगव्याला जास्त पसंती दिल्याचे दिसतेय. Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Analysis

एक प्रकारे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाचा हा लाभ ग्रामीण भागात शिवसेनेला वर्षभरानंतर मिळताना दिसतोय. शिवसेना महाविकास आघाडीत येऊन तिरंगी होण्याऐवजी भगवीच राहिली पाहिजे, हा आग्रहच मतदारांनी धरल्याचे मतमोजणीत दिसून येते आहे. भाजपला धक्का द्यायला मतदारांची हरकत दिसत नाही, पण तेथे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस त्यांना नकोय तर पर्याय म्हणून भगवी शिवसेनाच हवी हे मतदारांनी दाखवून दिले आहे.खरे म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्या टकरीत ग्रामीण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा लाभ व्हायला हवा होता. तो लाभ त्यांना हव्या त्या प्रमाणात तर झाला नाहीच. उलट ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज काँग्रेसी तिरंग्याकडून भगव्याकडे गेलेला राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला पाहावा लागतोय.

सगळी मराठी माध्यमे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने भाजपला मागे टाकल्याचे वर्णन आणि विश्लेषण करताहेत. पण ते विश्लेषण अर्धवट आणि काहीसे अप्रमाणिक आहे. कारण हा विजय फक्त महाविकास आघाडीचा असता तर त्यात दोन्ही काँग्रेसचे त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या नंबरचे वर्चस्व प्रस्थापित व्हायला हवे होते. ते दुपारी १२.३० पर्यंत तरी दिसलेले नाही. उलट सगळीकडे भगवाच फडकताना दिसतोय… फक्त त्याची शेड भाजपऐवजी शिवसेनेची दिसतेय किंवा राष्ट्रवादी ऐवजी भाजपची दिसतेय.

२० वर्षांपूर्वी काँग्रेसी पक्षांच्या वळचणीला बसून हिंदुत्ववादी पक्ष ग्रामीण राजकारण करायचे. आता ट्रेंड बदलून हिंदुत्ववादी पक्ष ग्रामीण महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसतेय. आणि काँग्रेसी पक्षांचे त्यांच्याभोवती फिरताना काँग्रेसी ज्येष्ठ नेत्यांना पाहावे लागतेय.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Analysis

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी