Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Analysis : जुने गड कोसळताहेत, नवे उभे राहाताहेत; काँग्रेसी तिरंग्याकडून वाटचाल भगव्याकडे


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पूर्वी १०० टक्के काँग्रेसी संस्कृतीच्या पक्षांचे वर्चस्व असायचे. पक्ष कोणतेही असतो, त्यांच्या नावात कुठेतरी काँग्रेस हे नाव असायचेच. आताही काँग्रेसच्या राजकारणाची नस ग्रामीण भागातले राजकारणात ही कायम आहे. Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Analysis :

पण तिची १०० टक्के जी मक्तेदारी होती पूर्णपणे मोडली गेली आहे. शिवसेना – भाजप या दोन हिंदुत्ववादी पक्षांनी ग्रामीण भागात नुसताच शिरकाव केलेला नाही, तर मोठे वर्चस्व निर्माण केल्याचे दिसतेय. शहरी भागात फार पूर्वीच उखडले गेलेले काँग्रेसी राजकारण ग्रामीण भागात ग्रासरूटपर्यंत उडखलेले दिसतेय. गावपुढारी म्हणजे काँग्रेसी हे समीकरण तर पुरते मोडीत निघालेय. त्याने नवे हिंदुत्ववादी रूप धारण केलेय. मग त्याच्या हिंदुत्वाची शेड शिवसेनेची असो की भाजपची.ग्रामीण भागातली सत्ताधारी घराणी वर्षानुवर्षे तीच राहिली हे खरेय. पण त्या घराण्यांनाही काँग्रेसी तिरंग्याकडून भगव्याकडे राजकीय प्रवास करावा लागलाय, हे आजच्या ग्रामपंचायत निकालांनी स्पष्ट होतेय.
हे राजकीय परिवर्तन ग्रासरूटमध्ये होणे, यालाच जुने गड कोसळून नवीन उभे राहाताहेत, असे म्हटले पाहिजे. गेल्या ३० वर्षांमध्ये झालेला हा बदल आहे. आणि तो करण्यात हिंदुत्ववादी पक्षांच्या लाखो कार्यकर्त्यांचा हात आहे.
पूर्वी काँग्रेस टाळून डाव्यांपासून उजव्यांपर्यंत कोणत्याच पक्षाला ग्रामीण राजकारण करताच येत नव्हते… इथून पुढच्या काळात भगवा टाळून कोणत्याही काँग्रेसी पक्षाला देखील ग्रामीण राजकारण करता येणार नाही, हे राजकीय परिवर्तन घडतेय. हा बदल २०२१ च्या ग्रामपंचायत निकालांनी सिध्द केला आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Analysis

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी