देशात लोकांना न्याय देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सर्वात प्रथम : इंडिया जस्टिस रिपोर्ट

Maharashtra first in the country to give justice to the people: India Justice Report

देशातील लोकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सर्वात आघाडीवर आहे. टाटा ट्रस्टने तयार केलेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट-2020 नुसार महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, तेलंगणा, पंजाब आणि केरळ यांचा क्रमांक लागतो. एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांपैकी त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा आपल्या नागरिकांना सर्वाधिक न्याय देत आहेत. Maharashtra first in the country to give justice to the people: India Justice Report


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील लोकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सर्वात आघाडीवर आहे. टाटा ट्रस्टने तयार केलेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट-2020 नुसार महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, तेलंगणा, पंजाब आणि केरळ यांचा क्रमांक लागतो. एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांपैकी त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा आपल्या नागरिकांना सर्वाधिक न्याय देत आहेत.अहवालानुसार, महिला न्यायाधीशांची संख्या भारतात 29 टक्के आहे. तथापि, उच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची सरासरी 11 ते 13 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, तर सहायक न्यायालये 28 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढली आहेत.

Maharashtra first in the country to give justice to the people: India Justice Report

दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश एम. बी. लोकूर यांनी या अहवालाची प्रस्तावना लिहिली असून प्रलंबित खटल्यांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. न्या. लोकूर यांच्या मते, राष्ट्रीय न्यायालयीन डेटा ग्रीडनुसार जिल्हा न्यायालयात 3.84 कोटी खटले प्रलंबित आहेत. यामध्ये सर्व उच्च न्यायालयात प्रलंबित 47.4 लाख खटले जोडले तर ही संख्या 4 कोटींच्या पुढे जाते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात न्यायालयीन सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली आहे.

Maharashtra first in the country to give justice to the people: India Justice Report

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती