काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

वृत्तसंस्था

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज दुपारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तो त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. स्वत: नाना पटोले यांनी ही माहिती दिली.Maharashtra Assembly Speaker Nana Patole resigns from his post, hands over his resignation to Deputy Speaker Narhari Zirwal.

‘वरीष्ठ नेत्यांनी मला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्याचे मी पालन करून राजीनामा दिला आहे’, असे नाना पटोले यांनी सांगितले.दरम्यान, नाना पटोले यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हा पटोले यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद देण्याचे निश्चित झाले आहे. याबाबत पटोले म्हणाले, मला फक्त विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले असून मी त्याचे पालन केले.

Maharashtra Assembly Speaker Nana Patole resigns from his post hands over his resignation to Deputy Speaker Narhari Zirwal.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*