MAHADISCOM Recruitment 2021: Recruitment for 7000 posts in Mahaviratan, 12th pass can also apply

MAHADISCOM Recruitment 2021: महाविरतणमध्ये 7000 पदांवर भरती, 12वी पासही करू शकतात अर्ज

बेरोजगार तरुणांना महावितरणमध्ये नोकरी (MAHADISCOM Recruitment 2021) मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. महावितरणने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी करून विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक पदांवर अर्ज मागवले आहेत. 18 फेब्रुवारी 2021 पासून अर्जांची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. आज अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. 12वी पास तरुणही या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेत विद्युत सहायकांच्या एकूण 5000 आणि उपकेंद्र सहायकांच्या एकूण 2000 पदांवर नियुक्त्या होणार आहेत. MAHADISCOM Recruitment 2021: Recruitment for 7000 posts in Mahaviratan, 12th pass can also apply


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बेरोजगार तरुणांना महावितरणमध्ये नोकरी (MAHADISCOM Recruitment 2021) मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. महावितरणने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी करून विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक पदांवर अर्ज मागवले आहेत. 18 फेब्रुवारी 2021 पासून अर्जांची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. आज अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. 12वी पास तरुणही या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेत विद्युत सहायकांच्या एकूण 5000 आणि उपकेंद्र सहायकांच्या एकूण 2000 पदांवर नियुक्त्या होणार आहेत.

पदांचा तपशील

एकूण पदे – 7000

विद्युत सहायक एकूण 5000 पदे

सामान्य- 1637 पदे
महिला- 1500 पदे
माजी सैनिक- 750 पदे
शिकाऊ उमेदवार – 500 पदे
खेळाडू – 250 पदे
अनुमानित (प्रोजेक्टेड)- 250 पदे
भूकंपाने प्रभावित- 99 पदे
अनाथ- 14 पदेउपकेंद्र सहायक एकूण 2000 पदे

सामान्य- 656 पदे
महिला- 600 पदे
माजी सैनिक- 300 पदे
शिकाऊ उमेदवार – 201 पदे
अनुमानित (प्रोजेक्टेड)- 99 पदे
खेळाडू- 98 पदे
भूकंपाने प्रभावित- 40 पदे
अनाथ – 6 पदे

वयोमर्यादा
उमेदवार 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 27 वर्षांपेक्षा कमी वयाचा असला पाहिजे.

शैक्षणिक योग्यता
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 12वी उत्तीर्ण असले पाहिजे. यासोबतच सेंटर ऑफ एक्सिलन्स किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून नॅशनल ट्रेड ट्रेनिंग सर्टिफिकेट (एनटीटीसी) किंवा दो वर्षांचा डिप्लोमा असला पाहिजे.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतींच्या आधारे केली जाईल.

वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 रुपयांपासून ते 27,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाऊ शकते.

महत्त्वपूर्ण तारखा
अर्ज नोंदणीस प्रारंभ – 18 फेब्रुवारी 2021
अर्ज नोंदणीची अखेरची तारीख – 20 मार्च 2021

अर्ज करण्याच्या अधिकृत लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

MAHADISCOM Recruitment 2021: Recruitment for 7000 posts in Mahaviratan, 12th pass can also apply

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*