ड्रग पेडलर्स उडत्या बॉलीवूडच्या महाभारतात नेमके दिसणार काय?


भूवनेश्वरी

मुंबई : नुकत्याच आलेल्या आणि सोशल मीडियावर ट्रेंडिग असलेल्या महाभारत सिनेमाच्या ट्रेलरमध्ये “उडत्या बॉलिवूड”चे ड्रग पेडलर्स काम करताना दिसणार आहेत हे लक्षात येतंय. अमीर खान, फरहान अख्तर, दीपिका पदुकोन, अभिषेक बच्चन, असे “उडते बॉलिवूड” यात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. (mahabharat trailer)

बी. आ. चोप्रा यांच्या महाभारतातील नितीश भारद्वाजने साकारलेला कृष्ण हा लोकांचा मनात एक वेगळाच स्थान निर्माण करून गेला. त्याची वेशभूषा त्याचा meakup आणि अर्थातच त्याचा अभिनय यांचा भन्नाट पगडा लोकांचा मनावर त्याने चढवला होता. नुसते glammer च नव्हे तर अभिनयातही निपुण असलेले कलाकार त्यांचा अभिनयाचे उत्तम सादरीकरण, त्याकाळच्या हिशेबाने साकारली गलेली टेक्नॉलॉजी आणि दिग्दर्शनाची उत्तम सांगड, आशा कलाकृतीचा एक उत्तम प्रयोग यशस्वीपणे साकार झाला होता.

त्याआधी मराठी आणि हिंदीतही शाहू मोडक यांच्या “कृष्णाने” अशीच जनमानसावर मोहिनी घातली होती. त्यांची कृष्ण रूपातली कॅलेंडर्स त्यावेळी देशभरातल्या घराघरात झळकली होती. दूरदर्शन मालिका रामायण यातली दीपिकाची “सीता” आणि अरुण गोविल यांचा “राम” हा तर पुन्हा दूरदर्शनवरून लॉकडाऊन च्या काळात रेकॉर्डब्रेक करून गेला.

पण आता या दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या महाभारतात “उडत बॉलिवूड” काम करणार आहे. हे बघून जरा भीतीच वाटली. कृष्णाचा प्रमुख भूमिकेत अमीर खान तर द्रौपदीच्या भूमिकेत दीपिका पादुकोन बघायला मिळणार आहेत. त्यामुळे एकंदरीत या महाभारतात कृष्णची “गीता” ऐकला मिळणार की ड्रग पँडलिंगचे ज्ञान? कृष्णाचा हातात बासरीच्या ठिकाणी हुक्क्याचा बार आणि द्रौपदीच्या मुखातून येणारा गांजाचा धूर दिसू नये म्हणजे झालं….!!

mahabharat trailer

कारण यातील काही सन्माननीय अपवाद वगळता जवळजवळ प्रत्येक नट-नटी वर ड्रॉइंग स्पेलिंग ड्रग्स पेडलिंग आरोप आहेत. वेगवेगळ्या देशद्रोहाचाशी संबंधित संशय आहेत. यातल्या “कृष्णाला” भारत असुरक्षित वाटतोय पण इस्लामी तुर्कस्तान सुरक्षित वाटतोय. त्यामुळे त्यांच्या महाभारतात ते कोणत्या “गीतेचा” उपदेश करणार याकडे खरा भारत संशयाने बघतोय…!!.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती