Madhya Pradesh byelection results 2020 : मध्य प्रदेशमध्ये भाजपा १८ जागांवर आघाडीवर; काँग्रेस ८, बसप २ जागांची सरशी


वृत्तसंस्था

भोपाळ : Madhya Pradesh byelection results 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना मध्य प्रदेशातही २८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले. पक्षांतरामुळे आमदारकी गेल्यानं मध्य प्रदेशात पुन्हा निवडणूक घेण्यात आली.

१९ जिल्ह्यातील विधानसभेच्या २८ जागांसाठी मध्य प्रदेशात मतमोजणी सुरु आहे. मध्य प्रदेशातील निकाल शिवराज सिंह चौहान सरकारचे भवितव्य निश्चित करणार आहेत तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांचा राज्याच्या राजकारणातील प्रभावही निश्चित होणार आहे.

Madhya Pradesh byelection results 2020

मतमोजणीचा आतापर्यंतचा जो कल आहे, त्यानुसार २८ पैकी १८ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस आठ तर बसपाचे उमेदवार दोन विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशात सरकार राखण्यासाठी भाजपाला फक्त आठ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. सध्याच्या संख्याबळानुसार, २३० सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत भाजपाचे १०७ आमदार आहेत तर काँग्रेसचे संख्याबळ ८७ आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था