मदरसे बंद करून ठाकरे सरकारने हिंदूत्व दाखवून द्यावे, अतुल भातखळकर यांची मागणी

आसाममधल्या भाजप सरकारने तिथले सगळे मदरसे बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्याचं पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले सगळे मदरसे बंद करून हिंदुत्ववादी सरकारने आपले खरे हिंदुत्व दाखवून द्यावे अशी मागणी भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आसाममधल्या भाजप सरकारने तिथले सगळे मदरसे बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्याचं पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले सगळे मदरसे बंद करून हिंदुत्ववादी सरकारने आपले खरे हिंदुत्व दाखवून द्यावे अशी मागणी भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भातखळकर म्हणाले की, मदरश्यांमध्ये कोणतंही आधुनिक शिक्षण न देता एका विशिष्ट धर्माचेच शिक्षण दिले जाते. यावर सरकारी तिजोरीतून कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. या मदरशांना आणि येथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात थेट मदत करावी.

मदरश्यांमध्ये धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली कट्टरतावादाचं शिक्षण दिले जाते, असे बोलले जाते. तरीही राज्यातील मंदिरे बंद असताना मदरसे मात्र सुरू आहेत. राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातली मंदिरे उघडण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर तुम्ही हिंदुत्व सोडून धर्मनिरपेक्ष झाला आहात का? खोचक सवालही केला होता. या पार्श्वभूमीवर भातखळकर यांनी मदरसे बंद करून देण्याची मागणी केली आहे.

भातखळकर यांनी जलयुक्त शिवाराच्या चौकशीवरूनही सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जलयुक्त शिवारची कामे 22 हजार 589 गावांमध्ये झाली. कॅगने केवळ 120 गावांमध्ये कामे तपासली. याचा अर्थ केवळ 0.53 टक्के गावं पाहिली गेली. 99.47 टक्के गावांमध्ये न जाताच तयार केलेला अहवाल वस्तुस्थितीदर्शक कसा असेल? अहवालात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही तरीही ठाकरे सरकार बोंबलतेय. महाराष्ट्रातले किती जिल्हे टँकर मुक्त झाले त्याचे आकडे पहा मग जलयुक्त शिवारचे यश लक्षात येईल.

आणि चौकशी काय उद्धव सरकारने यापुर्वी फडणवीस सरकारच्या वृक्षारोपण मोहीमेचीही केली होती, काय सापडले त्यात? काहीही नाही. सुडाचे राजकारण जनतेला व्यवस्थित कळते. वेळ आल्यावर जनताच सगळे हिशोब चुकते करेल, असाही टोला भातखळकर यांनी लगावला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*