मदरशांमधून लव्ह जिहादच्या प्रसारासाठी अरब देशांतून पैसा, साध्वी प्राची यांचा आरोप

मदरशांमधून लव्ह जिहादचा प्रसार केला जात असून यासाठी अरब देशांमधून पैसा येत आहे. सरकारने अशा घटनांची चौकशी करण्याची गरज असल्याचं सांगत लव जिहाद करणाºयांना फाशी देण्याची मागणीही साध्वी प्राची यांनी केली.


विशेष प्रतिनिधी 

लखनऊ : मदरशांमधून लव्ह जिहादचा प्रसार केला जात असून यासाठी अरब देशांमधून पैसा येत आहे. सरकारने अशा घटनांची चौकशी करण्याची गरज असल्याचं सांगत लव जिहाद  (love jihad news) करणाºयांना फाशी देण्याची मागणीही साध्वी प्राची यांनी केली. लखनऊमधील एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्राची म्हणाल्या, अरब राष्ट्रांमधून येणाºया पैशांमुळे हा प्रकार वाढीस लागला आहे.

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र जातीमधील मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी १० ते २५ लाखांचा निधी दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी मंदीरात नमाज पठनाचा एक प्रकार घडला होता. हे एक षडयंत्र होते. देशात भाईचारा गँग सक्रिय आहे, त्यांना मी इतकच सांगू इच्छिते की देशात एकता कायम रहावी यासाठी मी लखनऊ ज्या मशिदीत हवन करु इच्छिते. love jihad news


लव्ह जिहादच्या विरोधात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहीम सुरू केली आहे.आम्ही लव्ह जिहाद खपवून घेणार नाही. लव्ह जिहाद रोखण्यासाठी लवकरच प्रभावी आणि कठोर कायदा आणू. खोट्या नावाने आणि वेश बदलून मुलींची होणारी फसवणूक आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही. लव्ह-जिहाद जर सुरूच ठेवलं तर तुमचं रामनाम सत्य झालंच म्हणून समजा, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

love jihad news

लव जिहादच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. हरयाणामधील बल्लभगडमध्ये निकिता हत्याकांडवरून नागरिकांमध्ये रोष आहे. केंद्र सरकार लव्ह जिहाद प्रकरणांच्या चौकशीच्या मार्गांचा विचार करत आहे, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही सांगितले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*