केवळ विवाहासाठी धर्मांतर वैध नाही, अलाहाबाद न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय


  • लव्ह जिदाह प्रकरणांमध्येही हाच न्याय लागू करणे शक्य

वृत्तसंस्था

अलाहाबाद : धर्मांतराबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून केवळ विवाहासाठी धर्मांतर वैध नाहीअसे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा दूरगामी परिणाम घडवू शकेल असा निर्णय दिला. यावेळी न्यायालयाने जोडप्याची याचिकेदेखील फेटाळून लावली. तसेच न्यायालयाने याचिकाकर्त्यांना संबंधित दंडाधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडण्याची सूट दिली आहे. love jihad news

याचिकाकर्त्याने कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करण्यास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयानं या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्यांपैकी एक व्यक्ती हिंदू आणि दुसरी व्यक्ती मुस्लीम आहे. मुलीने २९ जून २०२० रोजी हिंदू धर्म स्वीकारला आणि एका महिन्यानंतर ३१ जुलै रोजी विवाह केला. love jihad news

केवळ विवाहासाठी धर्मांतर करण्यात आल्याचं नोंदींवरून स्पष्ट होत असल्याचे निरीक्षणही न्यायालयानं नोंदवले. यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने नूरजहां बेगम खटल्याच्या निर्णयाचा हवाला दिलाज्यामध्ये न्यायालयानं विवाहासाठी धर्मांतर करणे मान्य नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणात हिंदू समाजातील मुलीने धर्मांतर करून मुस्लीम समजातील मुलाशी विवाह केला होता.

love jihad news

हिंदू समाजातील मुलगी धर्मांतर करून मुस्लीम समाजातील मुलाशी विवाह करू शकते आणि तो विवाह वैध असेल का हा प्रश्न होता. यासाठी न्यायालयाने कुराणच्या हदीसचा हवाला देत इस्लामबाबत माहिती न घेता आणि विना आस्थाविश्वासाने केवळ विवाह करण्याच्या दृष्टीनं धर्मांतर करणे स्वीकार्य नसल्याचे म्हटले होते. याच खटल्याचे उदाहरण देत न्यायालयानं याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळत दिलासा देण्यास नकार दिला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती