लव्ह जिहाद’नंतर फटाके बंदीची भलामण; तनिष्कच्या दुसऱ्या जाहिरातीवरही हिंदूविरोधी प्रोपेगंडाचा आरोप


‘दिवाळी कशी साजरी करायची, ते शिकवू नका..’


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : आता तनिष्कच्या जाहिरातीने आम्हाला सांगावे, दिवाळी कशी साजरी करावी, अशा शब्दांत सोशल मीडियावर तनिष्कच्या जाहिरातीवर टिका केली आहे. या जाहिरातीवरही हिंदूविरोधी प्रोपेगंडा चालविल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कर्नाटकचे भाजप आमदार सीटी रवी यांनी तनिष्कवर टीका करताना म्हटले आहे की, कंपनीने आपले प्रोडक्ट विकण्यावर लक्ष्या द्यावे, लोकांना दिवाळी कशी साजरी करायची, ते शिकवू नये. सोशल मीडियावर ट्रोलर्स तनिष्कला बायकॉट करण्याची मागणी करत आहेत. तनिष्कने आपली नवीन जाहिरात एकत्वम ब्रांडसाठी जारी केली आहे.


यापूर्वी तनिष्कने दिवाळीसाठी एक जाहिरात रिलीज केली होती, यावरुनही मोठा वाद झाला होता. या जाहिरातीतून लव्ह जिहाद आणि खोट्या धर्मनिरपेक्षता पसरवण्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर कंपनीने ही जाहिरात परत घेतली होती.

तनिष्कच्या या नवीन दिवाळी अ‍ॅडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता, निमरत कौर, शायनी गुप्ता आणि अलाया फर्नीचरवाला एकतेचा संदेश देताना दिसत आहेत. त्या तनिष्कची ज्वेलरी घालून सांगत आहेत की, दिवाळी सणात काय करावे आणि काय करू नये. या जाहिरातीतून कोरोना काळात कशाप्रकारे दिवाळी साजरी करावी, याबाबतही सांगितले जात आहे. तनिष्ककडून दिवाळी कशी साजरी करावी, याबाबत सांगण्यात येत असल्यामुळे अनेकजण जाहिरातीवर टीका करत आहेत. तसेच, या अ‍ॅडला बॅन करण्याची मागणीही होत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती