लॉकडाऊनमुळे चीनी व्हायरसबाधितांचा रिकव्हरी रेट ८८ टक्के, पंतप्रधानांचे प्रतिपादन

चीनी व्हायरस साथीच्या सुरुवातीच्या काळातच भारताने लवचिक लॉकडाउन जाहीर केल्यानं आज कोरोना बाधितांचा रिकव्हरी रेट ८८ टक्के आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरस साथीच्या सुरुवातीच्या काळातच भारताने लवचिक लॉकडाउन जाहीर केल्यानं आज कोरोना बाधितांचा रिकव्हरी रेट ८८ टक्के आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

दरवर्षी वैश्विक मुद्द्यांवर होणाऱ्या ग्रँड चॅलेंजेसच्या ऑनलाइन वार्षिक बैठकीत पंतप्रधान बोलत होते. मोदी म्हणाले की, भारताचा जगातील इतर देशांच्या तुलनेत कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे आणि रिकव्हरी रेट ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हे घडू शकलं कारण भारत हा सुरुवातीच्या काळातच काहीसे रुग्ण आढळून आले होते, तेव्हाच लवचिक लॉकडाउनचे धोरण अवलंबणाऱ्या देशांपैकी एक होता. त्याचबरोबर लोकांना मास्क वापरण्यास प्रोत्साहित करणाऱ्या सुरुवातीच्या देशांमध्ये होता. त्याचबरोबर भारताने प्रभावी पद्धतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम केले. सुरुवातीलाच रॅपिड अँन्टजेन टेस्ट लागू करणाऱ्या देशांमध्येही भारत होता.

आपण सुरुवातीला अनेक पावलं उचलली ज्यामुळे आरोग्य सुविधा सुधारली. सॅनिटायझेशन, स्वच्छतेवर भर दिला याचा सर्वाधिक फायदा गरिबांना आणि कमजोर लोकांना होत आहे. त्याचबरोबर भारत हा चीनी व्हायरसवर लस बनवण्याच्या कार्यात आघाडीवर आहे. जगातील ६० टक्के लस निर्मिती ही भारतात होते. भारत वैश्विक आरोग्य सेवा निर्मितीमध्येही आघाडीवर आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

भविष्यात एक असा समाज तयार होईल जो विज्ञान आणि संशोधनात गुंतवणूक करेल. यासाठी आपल्याला दूरदृष्टीने गुंतवणूक करावी लागेल तेव्हाचा याचा फायदा होईल. या बैठकीचे आयोजन भारतात होणार होतं मात्र कोरोना महामारीमुळं याचं व्हर्च्युअल आयोजन करण्यात आलं. तंत्रज्ञानाची एवढी मोठी ताकद आहे की महामारीच्या काळातही आपल्याला ती वेगळी करु शकली नाही, अशा शब्दांत मोदींनी तंत्रज्ञानाचा गौरव केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*