लॉकडाऊन लावा, पण व्यक्तींच्या हालचालींवर बंदी आणू नका, केंद्राच्या मार्गदर्शक सूचना

केंद्राने आपल्या नव्या निदेर्शानुसार जिल्हा / उपजिल्हा व शहर / प्रभाग स्तरावर लॉकडाऊनप्रमाणे निर्बंध लादण्यास परवानगी दिली आहे. परंतु, राज्यव्यापी टाळेबंदी करता येणार नाही. तसेच व्यक्ती आणि वस्तूंच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत हालचालींवर कोणतीही बंदी असणार नाही, असेही यात आदेशात म्हटले आहे Lockdown, but do not restrict the movement of individuals, the Centre’s guidelines


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्राने आपल्या नव्या निदेर्शानुसार जिल्हा / उपजिल्हा व शहर / प्रभाग स्तरावर लॉकडाऊनप्रमाणे निर्बंध लादण्यास परवानगी दिली आहे. परंतु, राज्यव्यापी टाळेबंदी करता येणार नाही. तसेच व्यक्ती आणि वस्तूंच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत हालचालींवर कोणतीही बंदी असणार नाही, असेही यात आदेशात म्हटले आहे.

देशातील कोविड -१९ प्रकरणांच्या आकस्मिक वाढीबाबतचे हे नवीन नियम आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. ही मार्गदर्शक सूचना ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. गृह व मंत्रालयाने मंगळवारी एक नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केले असून ते १ एप्रिलपासून अंमलात आणण्यात येणार आहे. यामध्ये राज्य आणि केंद्र शासित प्रदेश अधिकाऱ्याना कोविड -१९ प्रकरणांची चाचणी, मागोवा घेण्यावर आणि उपचारांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. देशात कोविड१९ ची रूग्णसंख्या गगनाला भिडत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रमुख यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चात विविध प्रश्नांवर चर्चा केलीहोती. आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण विहित ७० टक्क्यांपर्यंत वाढवण्याव्यतिरिक्त, राज्यांना मागील वर्षीप्रमाणे कंटेंट झोनचे सीमांकन करतानाच प्रकरणांचा मागोव घेण्यावर तसेच उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करावे.

लसीकरणासंदर्भात केंद्राने म्हटले आहे की वेग वेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाची गती असमान आहे आणि काही राज्यामधील संथ गती ही चिंताजनक बाब आहे. सध्याच्या परिस्थितीत कोविड -१९ विरूद्ध लसीकरण संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी गरजेची आहे, असे त्यात म्हटले आहे.

Lockdown, but do not restrict the movement of individuals, the Centre’s guidelines

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*