LIVE : वर्षा निवासस्थानी संजय राठोड ; मुख्यमंत्र्यांसह शिवसेना मंत्र्यांची उपस्थिती ; अभय की राजीनामा ?

  • वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना मंत्र्यांची उपस्थिती; संजय राठोड यांच्यावरील आरोपांवर चर्चा
  • शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्रीही दाखल

 

विशेष प्रतिनिधी

मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड  थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या  भेटीला पोहोचले आहेत. संजय राठोड वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरत आहे. संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभय देणार की त्यांचा राजीनामा घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. LIVE: Shiv Sena ministers present at Varsha residence; ‘Abhay’ OR REsignation?’

काँग्रेस-राष्ट्रवादीच दबाव

काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री  संजय राठोड विषयावरून नाराज आहेत . विशेष म्हणजे शरद पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राठोड शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सीएम ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दबाव निर्माण केलाय. संजय राठोडप्रकरणी मुख्यमंत्री अधिवेशन सुरू होण्याआधी निर्णय घेतील, अशी अपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांनी व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलंय.

अजब सरकार की गजब कहाणी : मुनगंटीवार

दरम्यान , भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राठोड यांच्या प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती.

मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा वर्षभराचा प्रवास झाला आहे. एक मित्र म्हणून त्यांच्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर कमी होणार आहे, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले.

महाराष्ट्र पुरोगामी विचारावर पुढे जाणारं राज्य आहे. ऑडिओ क्लिप आहेत, त्यातील आवाज हुबेहुब आहे. खोट्या ऑडिओ क्लिप कोणी तयार करत असतील तर पोलीस विभागानं कारवाई केली पाहिजे. जे लोक ऑडिओ क्लिप तयार करतात, त्यांच्या मुसक्या आवळा. जे लोक क्लिप पसरवणारे पकडू शकत नाहीत ते लोक आतंकवादी, दहशतवादी पकडू शकतील का? 15 हजार कोटी रुपये आपण यासाठी खर्च करतो का? असा सवाल सुधीर मुनंगटीवार यांनी केला आहे. याप्रकरणामुळे राज्यात चुकीचा संदेश गेला आहे.

LIVE: Shiv Sena ministers present at Varsha residence; ‘Abhay’ OR  resignation?’

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*