षडयंत्र : शाहीन बाग भडकाविणारेच लाल किल्यातील हिंसाचारात सक्रीय असल्याचे सिद्ध

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रजासत्कादिनी लाल किल्यात झालेल्या हिंसाचारात मोठे षडयंत्र असल्याचे समोर येत आहे. पोलीसांनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक केलेला एक जण शाहीन बागेतील आंदोलनातही सक्रीय होता असे दिसून आले आहे.Links emerges between ShahinBaug and Red Fort violence

नागरिकता संशोधन कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बागेत आंदोलन झाले होते. त्यानंतर दिल्लीमध्ये दंगलही घडविण्यात आली. देशात अनेक ठिकाणी शाहीन बागसारखे आंदोलन पेटविण्यात आले. हाच फॉर्म्युला दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही वापरण्याचे षडयंत्र दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने धर्मेन्द्र सिंह हरमन नावाच्या व्यक्तीला अठक केली आहे.

हरमनवर लाल किल्यात हिंसा करणाºयांना भडकवण्याचा आरोप आहे. हरमन आपल्या मोटारीवर चढून घोषणाबाजी करत लाल किल्यात घुसला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि त्या आधारे त्याला अटक करण्यात आले आहे. हरमन शाहीन बागमध्ये झालेल्या आंदोलनाती सक्रिय असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.पोलीसांनी लाल किल्यात हिंसचाराप्रकरणी व्हिडीओ फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला आहे. त्यामध्ये दिल्लीतील रहिवासी असलेल्या धर्मेंद्रसिंह हरमन याला अटक करण्यात आली आहे.

एका व्हिडीओमध्ये २६ जानेवारीला लाल किल्यातील हिंसाचाराच्या वेळी हरमन लोकांना भडकाविताना स्पष्ट दिसत आहे. मोटारीवर उभा राहून तो आंदोलकांना भडकावित आहे. पोलीसांना आंदोलनाच्या वेळी धर्मेंद्रसिंहचे लोकेशन लाल किल्याजवळच दिसून आले आहे.

Links emerges between ShahinBaug and Red Fort violence

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*