विकास व राजकारण यांचा संबंध जोडणे जगासाठी घातक, भारताचा सुरक्षा परिषदेत जगाला इशारा

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क – विकास आणि राजकारण यांचा संबंध जोडण्यापासून सर्व देशांनी स्वत:ला आवरावे, अन्यथा आपत्कालीन परिस्थितीत अन्न सुरक्षेचे आव्हान निर्माण होऊ शकते, असा इशारा भारताने जगाला दिला दिला. Linking development and politics is dangerous for the world, India’s warning to the world at the Security Council

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आज ‘संघर्ष आणि अन्न सुरक्षा’ या विषयावर चर्चा झाली. यावेळी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस म्हणाले जेव्हा तुम्ही लोकांना अन्न नाकारता, त्यावेळी तुम्ही संघर्षाला खतपाणी घालत असता.ज्यावेळी देशाला संघर्ष आणि भूकेचा प्रश्ना भेडसावतो त्यावेळी धोकादायक परिस्थिती निर्माण होते. हे दोन्ही प्रश्ना एकाच वेळी सोडवावे लागतात. या दोन प्रश्नांआबरोबरच असमानता, पर्यावरणाचा ऱ्हास, धार्मिक तेढ आणि भौगोलिक वाद यामुळे संघर्ष फोफावतो.

भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले,‘संघर्षग्रस्त भागांमध्ये देणगीदार देशांनी अधिक मदत पोहोचविण्याची गरज आहे. तसेच, लोकांच्या मूलभूत गरजांचे राजकारण न होऊ देता मानवतावादी मदत करणाऱ्या संस्थांना पुरेशा प्रमाणात निधीही मिळायला हवा. सध्या मात्र आपत्कालीन परिस्थितींमध्येह राजकारण आणले जाते, ही बाब चिंताजनक आहे. देणगीदारांनीच अशी राजकीय भूमिका घेतल्यास अन्न सुरक्षसमोर आव्हाने निर्माण होतील.’

Linking development and politics is dangerous for the world, India’s warning to the world at the Security Council

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*