भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती : 1 फेब्रुवारीला पदग्रहण


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती 1 फेब्रुवारीला पदग्रहण करणार आहेत. लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती सध्या दक्षिण सैन्य विभागाचे कमांडर आहेत. मावळते लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी त्यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. Lieutenant General CP Mohanty as Deputy Chief of the Indian Army

भारतीय लष्करात दुसऱ्या क्रमांकाचे हे महत्वपूर्ण पद मानले जाते. लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती हे भारताचे 42 वे उपप्रमुख असून त्यांना पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील अनुभव आहे.आसाममधील दहशवादविरोधी कारवाईत त्यांनी भाग घेतला होता. कांगो येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या लष्करी पथकाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. 1 फेब्रुवारीपासून लष्कर उपप्रमुख म्हणून ते काम पाहतील.

Lieutenant General CP Mohanty as Deputy Chief of the Indian Army

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती