महाराष्ट्राच्या कारभाराबाबत अनेकांची पत्रे, प्रचारात व्यग्र असल्याचे सांगत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा गर्भित इशारा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग एकटेच नव्हे तर अनेक इतर निरिक्षकांनाही केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारच्या कारभाराबद्दल पत्र लिहिले आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. मी सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे असे सांगताना सरकारला गर्भित इशाराही शहा यांनी दिला आहे. Letters from many regarding the governance of Maharashtra implicit warning of Union Home Minister Amit Shah saying that he is busy in campaign


विशेष प्रतिनिधी

मेदिनीपूर: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग एकटेच नव्हे तर अनेक इतर निरिक्षकांनाही केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारच्या कारभाराबद्दल पत्र लिहिले आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. मी सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे असे सांगताना सरकारला गर्भित इशाराही शहा यांनी दिला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस दलातील लक्तरे वेशीला टांगले. खुद्द गृहमंत्र्यांनी एका सहाय्यक पोलीस निरिक्षकाला बारवाल्यांकडून महिन्याला १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. आपल्या बदलीबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली असून गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीची मागणी केली आहे.या पार्श्वभूमवर शहा यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पाच राज्यांतील निवडणूक प्रचार संपल्यावर आपण महाराष्ट्रातील घडामोडींकडे लक्ष देणार असल्याचा इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला आहे. शहा म्हणाले, उद्धव ठाकरे यांना आपण कुठलाही सल्ला देणार नाही. पण हा नैतिकतेचा प्रश्न आहे आणि त्यांनी विचार केला पाहिजेहा प्रश्न फक्त पोलीस आयुक्तांचा नाही. तर इतर निरीक्षकांनीही केंद्र सरकारला पत्र लिहिली आहेत. पण मी सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे.देवेंद्र फडणवीस यांनी जो अहवाल दिला आहे तो आपण आरामात बघू. पण हा नैतिकतेचा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्र सरकारने आपली नैतिकता दाखवली पाहिजे.

अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदावरून हटवण्याच्या प्रश्नावरही शहांनी उत्तर दिलं. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कुठलाही सल्ला देणार नाही. पण हा प्रश्न नैतिकतेचा आहे. त्यांनी विचार केला पाहिजे, असं शहा म्हणाले. शरद पवारांना काही सल्ला देणार का? असं विचारल्यावर शहांनी नकार दिला.

दरम्यान, महाराष्ट्रातील आयपीएस आणि नॉन आयपीएस पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेट प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. त्यांना पुरावेही दिले. तसंच या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीही फडणवीस यांनी केली आहे. तर या प्रकरणाची योग्य दखल घेऊन सरकार नक्कीच कारवाई करेल, असं आश्वासन केंद्रीय गृह सचिवांनी फडणवीस यांना दिलं आहे.

Letters from many regarding the governance of Maharashtra implicit warning of Union Home Minister Amit Shah saying that he is busy in campaign

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*