ईव्हीएम नव्हे, तर मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा कायदा करण्याबाबत ठाकरे -पवार सरकारच्या हालचाली

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका मतदानपत्राने घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तसा कायदा बनविण्यासाठी बैठक बोलावून चर्चा केली आहे. Legislative Assembly elections will be held through ballot papers

मतदान यंत्रामुळे निवडणुकीत गैरप्रकार होतात, असा आरोप अनेक पक्षांनी केला होता. त्यामुळे आता मतदान यंत्रा बरोबर मतपत्राद्वारे निवडणूक घेण्यात, यावी असा कायदा केला जाणार आहे.मतदान पत्राद्वारे निवडणूक घेण्यासाठी कायदा बनवावा, यासाठी बोलावलेल्या बैठकीला नाना पटोले यांच्यासह सचिव राजेंद्र भागवत, मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग, न्याय विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव उपस्थित होते.

घटनेच्या 328 व्या कलमानुसार मतदान यंत्रबरोबरच मतदान पत्रांचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

Legislative Assembly elections will be held through ballot papers

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*