लष्कर-ए- मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिक जेरबंद, काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचे मोठे यश


जम्मू-काश्मीरवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आले आहे. जम्मू आणि अनंतनाग पोलिसांनी एक संयुक्त मोहीम राबवत लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला जेरबंद केले आहे.Lashkar-e-Mustafa leader Hidayatullah Malik arrested security forces major success in Kashmir


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आले आहे. जम्मू आणि अनंतनाग पोलिसांनी एक संयुक्त मोहीम राबवत लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला जेरबंद केले आहे.Lashkar-e-Mustafa leader Hidayatullah Malik arrested security forces major success in Kashmir

लष्कर-ए-मुस्तफा ही दहशतवादी संघटना काश्मीर घाटीमधील पाकिस्तानी दहशतवादी समूह जैश-ए-मोहम्मदची प्रमुख संघटना आहे. जम्मूच्या पोलिस महासंचालकांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.मलिकला अटक केल्यानंतर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक तपासात हिदायतुल्ला मलिक हा जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचत होता. जम्मूचे एसएसपी श्रीधर पाटील यांनी सांगितलं की, जम्मूच्या कुंजवानीजवळ दहशतवादी हिदायतुल्ला मलिकला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड हस्तगत करण्यात आला आहे. जेव्हा पोलिस त्याला अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्याने पोलिसांवर हल्ला केला. हिदायतुल्ला मलिकच्या अटकेमुळे दहशतवादी कारवायांशी निगडीत महत्वपूर्ण माहिती, भारतीय लष्कराच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Lashkar-e-Mustafa leader Hidayatullah Malik arrested security forces major success in Kashmir

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था