भेसळयुक्त खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त,मुंबईत एफडीएची कारवाई ; 50 टक्के खाण्यास अयोग्य

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : मुंबईत भेसळयुक्त तेलाचा मोठा साठा अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकून जप्त केला आहे. सुमारे 4 कोटी 98 लाखांचा हा बेकायदा आणि भेसळयुक्त तेलाचा साठा होता.Large stocks of adulterated edible oil seized FDA action in Mumbai 

नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्यतेल मिळावे, यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने ठिकठिकाणी वछापे टाकण्यापूर्वी तेलाचे नमूने गोळा केले होते. त्यातील अनेक नमुन्यात आरोग्यासाठी घातक भेसळयुक्त पदार्थ आढळले होते.त्यात रंग आणि अन्य तेलाचा समावेश होता. 50 टक्के तेल मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे उघड झाले आहे.93 पैकी 49 नमुन्यात भेसळ आढळली होती. त्यानंतर अशा भेसळयुक्त तेलावर कारवाई करून ते जप्तही केले आहे. भविष्यातही अशी मोहीम राबवून तेलातील भेसळ रोखली जाईल, असा इशाराही दिला आहे.

Large stocks of adulterated edible oil seized FDA action in Mumbai

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*