वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उजनी धरणाच्या जलाशयात विमान उतरविण्याचा प्रकल्प सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. या संदर्भातील पत्र त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री हरादीप सिंग पुरी यांना दिले आहे.Landing of aircraft in Ujani reservoir Project implementation Letter from MP Supriya Sule to Minister Haradeep Singh Puri
अहमदनगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर उजनी जलाशय आहे. त्यामुळे अशी विमानसेवा सुरु झाली तर त्यांना अधिक फायदा होणार आहे. विशेष म्हणजे लोहगाव विमानतळापासून 125 किलोमीटरवर हा जलाशय आहे.
तसेच पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना तसेच भिगवण पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पात विमान हे थेट जलाशयात उतरणार आहे.
या माध्यमातून गोवा, ठाणे, सरदार सरोवर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर या विमानतळांना कनेक्टिव्हिटी सोपी होणार आहे. उजनी जलाशय अतिशय खोल असून हवामान अनुकूल आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथे फायदेशीर ठरू शकेल, असा विश्वास सुळे यांनी पत्रात व्यक्त केला आहे.