ला इलाहा इल्लल्लाह चालते तर जय श्रीराम का नाही? भाजपाचा ममता बॅनर्जींना सवाल


पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्यामुळे  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चिडून भाषणच केले नाही. यावरून भाजपाने त्यांना सवाल केला आहे की आपल्याला कार्यक्रमात ला इलाहा इल्ललाह चालते तर जय श्रीराम का चालत नाही? La ilaha illallah runs then why not Jai Shriram mamata banerjee say bjp


वृत्तसंस्था

कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चिडून भाषणच केले नाही. यावरून भाजपाने त्यांना सवाल केला आहे की आपल्याला कार्यक्रमात ला इलाहा इल्ललाह चालते तर जय श्रीराम का चालत नाही?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात जय श्रीराम आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या. यामुळे ममता बॅनर्जी नाराज झाल्या. त्यांनी भाजपावर टीका करताना म्हटले होते की, हा राजकीय कार्यक्रम नाही. कार्यक्रमात निमंत्रित करून अपमानित करणे योग्य नाही. त्यामुळे मी या कार्यक्रमात बोलणार नाही.पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्षाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी नमाज पढताना दिसत असून पार्श्वभूमीवर ला इलाहा इल्ललाह ऐकू येत आहे. त्यावरून ममतांना सवाल केला आहे की, तुम्ही कार्यक्रमात मुस्लिम पध्दतीने प्रार्थना करता तर तुम्हाला जय श्रीराम म्हणण्यात काय अडचण आहे? हे केवळ तुष्टीकरणासाठी चालले आहे का? यातून आपण बंगालला आणि नेताजींच्या वारशालाही अपमानित केला आहे.विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणिस डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, आजपर्यंत जय श्री राम म्हटल्यावर पूर्वी केवळ रावणाला अपमानित झाल्याचे वाटायचे. पण आता धर्मनिरपेक्ष माफियांनाही जय श्रीराम म्हटल्यावर अपमान वाटायला लागला आहे. पराभव होण्याच्या भीतीने हताश झाल्यामुळे आपण देशाच्या आत्म्यालाच अपमानित करत आहात का?

भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांनी एका पवित्र व्यासपीठावरून जय श्रीराम नावाचा राजकीय अजेंडा सेट केला आहे. अल्पसंख्यांंकांचे तुष्टीकरण करण्यासाठीच त्यांनी ही कृती केली आहे.

La ilaha illallah runs then why not Jai Shriram mamata banerjee say bjp

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती