मुकेश अंबानी – जिलेटिन कांड्या – पुरवठादार – राम मंदिर देणगी यावर कुमार केतकर राज्यसभेत “बादरायणी” बोलले; सभापतींनी फटकारून रेकॉडमधून काढले!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – राज्यसभेचे काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आज बऱ्याच दिवसांनी राज्यसभेत बोलले. त्यांनी मुकेश अंबानी – मनसुख हिरेन – जिलेटिन कांड्या पुरवठादार – राम मंदिर आदी विषयांचे बादरायणी संबंध जोडले. पण हे अनाठायी आरोप आहेत, हे लक्षात येताच सभापती वेंकय्या नायडू यांनी ते रेकॉर्डवरून ताबडतोब हटविले. kumar ketkar alleges and demand inquiry into mansukh hiren murder case

कुमार केतकर म्हणाले होते, क मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पार्क केलेल्या गाडीत सापडलेले जिलेटीन नागपूरच्या ज्या कंपनीत तयार झाले. त्या कंपनीची, डिस्ट्रीब्युटर किंवा पुरवठादार यांची चौकशी का केली जात नाही…, असा सवाल कुमार केतकर यांनी उपस्थित केला. येथपर्यंत सभापतींनी केतकरांचे ऐकून घेतले.पण त्यानंतर जिलेटीन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राम मंदिरासाठी १५ कोटी रुपये दिले आहेत, त्यामुळे याची चौकशी केली जात नाही, असा आरोपही कुमार केतकर यांनी केला. तेव्हा सभापतींनी त्यांना फटकारले. तुम्ही सदनात नसलेल्या व्यक्तीवर आरोप करत आहात, हे तुमचे आरोप मला रेकॉर्डमधून हटवावे लागतील, असे सभापतींनी केतकरांना सुनावले. त्याबरोबर केतकर यांनी वरमून आपण फक्त चौकशीची मागणी करतो आहोत, असे सांगून गप्प बसले.

kumar ketkar alleges and demand inquiry into mansukh hiren murder case

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था