पौर्णिमेच्या अश्रूंमध्ये दाटल्या कोठारी बंधूंच्या बलिदानाच्या आठवणी

विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : अयोध्येतील राममंदिराच्या कारसेवेसाठी गेलेल्या पश्चिम बंगालमधील दोन सख्या बंधूनी अनुक्रमे शरद आणि रामकुमार कोठारी यांनी बलिदान दिले होते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी त्यांना आदरांजली वाहून त्याच्या स्मृतींना उजाळा दिला.. विजया रहाटकर सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून विधानसभा निवडणूक होईपर्यंत त्या कोलकत्यात राहणार आहेत.Kothari bandhu balidan; vijaya rahatkar pays tribute

कोलकत्यातील बुरबार बाजारपेठेत राहणाऱ्या शरद आणि रामकुमार कोठारी यांनी कोवळ्या वयात राममंदिरासाठी बलिदान दिले होते. सध्या त्यांची बहीण पौर्णिमा तेथे राहते. ती भाजपच्या बंगाल मोर्चाची कोषाध्यक्ष आहे. प्रत्येक हिंदुत्ववाद्याचे श्रद्धास्थान असलेल्यास कोठारी बंधूंच्या घराला भेट देण्याची संधी रहाटकर यांना मिळाली.
घर न्याहाळताना त्यांना भीतीवर लावलेले कोठारी बंधुंचे फोटो दिसले आणि 1990 मधील राममंदिराच्या संघर्ष आणि त्यांच्या बलिदानाचा घटनाक्रम त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेला.21 ऑक्टोबर 1990 रोजी कोठारी बंधू अयोध्येत कारसेवेसाठी पोचले. मुलायमसिंग सरकारने वाहने, बस रोखुन मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 200 किलोमीटर पायपीट करून ते पोचले होते.एका साधूने पोलिसांचे वाहन हिसकावून बेरिकेड्स तोडले. शेकडो कारसेवक बाबरी मशिदीकडे धावले. त्यात कोठारी बंधू आघाडीवर होते. त्यांनीच मशिदीवर चढून भगवा झेंडा लावला होता. त्यामुळे बिथरलेल्या मुलायमसिंग सरकारने कारसेवकाना वेचून लक्ष्य केले.हनुमानगढी परिसरात झालेल्या गोळीबारात कोठारी बंधू यांचा मृत्यू झाला होता. पाचशे वर्षांच्या राममंदिराच्या संघर्षात कोठारी बंधू आपले नाव कोरून अजरामर झाले.

पौर्णिमेचा अश्रूंचा बांध फुटला

भावांच्या आठवणीने पौर्णिमेचा अश्रूंचा बांध फुटला. आतापर्यंत असे वाटायचे कि, भावांच्या बालिदानाच काय उपयोग झाला. पण, आता राममंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, अशी भावना आहे. कित्येक पिढ्यांचे राममंदिराचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आणि त्यांना मिळालेल्या सदिच्छामुळे आता साकार होत आहे. माझे दोन्ही बंधू अजरामर झाले आहेत. मी खूप समाधानी आहे, असे पौर्णिमा यांनी सांगितले.

Kothari bandhu balidan; vijaya rahatkar pays tribute

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*